फोटो सौजन्य: तृप्ती डिमरी इन्स्टाग्राम
‘ॲनिमल’, ‘भुल भुलैया ३’, ‘बॅड न्यूज’ आणि ‘विकी विद्या का वोह वाला व्हिडिओ’ या चित्रपटांतून प्रकाशझोतात आलेल्या तृप्ती डिमरीचा आज वाढदिवस आहे. २३ फेब्रुवारी १९९३ रोजी जन्मलेली तृप्ती डिमरी आज ३१ वा वाढदिवस आहे. अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या फिल्मी करियरवर एक नजर टाकूया, तिला कोणत्या चित्रपटामुळे सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली ? फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणत्या चित्रपटातून ती आली ? यासह अनेक प्रश्नाचे उत्तर या बातमीतून आपण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
‘गुलाबी दर्यात प्रेमाची लहर…’ दीराच्या लग्नात आलियाचा Sweet लुक
२३ फेब्रुवारी १९९३ रोजी जन्मलेली तृप्ती डिमरीला प्रसिद्धी मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. तृप्तीने युट्यूबच्या माध्यमातून अभिनयाला सुरुवात केली हे फार कमी लोकांना माहिती आहे. तृप्ती काही वर्षांपूर्वी युट्यूबवर ‘विप्रा डायलॉग्स’ नावाच्या यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओ बनवायची. त्या युट्यूब चॅनलवर आजही तिच्या व्हिडिओ उपलब्ध आहेत. युट्यूबवर व्हिडिओ बनवत असताना तृप्तीने मॉडेलिंगमध्ये आपलं करियर करण्याचं ठरवलं. तिथूनच तिला फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याचा मार्ग मिळाला.
अभिनेता किरण गायकवाड झळकणार कोकणी गीतात, गाण्याचा प्रोमो रिलीज
२०१७ मध्ये, तृप्ती डिमरीला बॉबी देओल स्टारर ‘पोस्टर बॉईज’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. यामुळे तिला प्रसिद्धीही मिळाली. त्या चित्रपटानंतर तृप्तीला ‘लैला मजनू’, ‘बुलबुल’ आणि ‘काला’ सारख्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पण तृप्तीला खरी प्रसिद्धी मिळाली ती रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटातून. या चित्रपटात अभिनेत्रीने रणबीरसोबत अनेक इंटिमेट सीन्स दिले. यामुळे ती बराच काळ चर्चेत राहिली. तृप्तीच्या कामाबद्दल बोलायचे तर, तृप्ती डिमरी शेवटची ‘भूल भुलैया ३’ चित्रपटात दिसली होती. हा तिचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट ठरला होता.