सिनेरसिकांसाठी मेजवानी! ९ जानेवारीपासून 'थर्ड आय' आशियाई चित्रपट महोत्सवाचा पारंभ (Photo Credit - X)
‘२२वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’ दिनांक ९ जानेवारी ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. याविषयी किरण व्ही. शांताराम यांनी स्वतः माहिती दिली. सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवात आशियाई तसेच भारतीय चित्रपटांचा समावेश असून, यंदा एकूण ५६… pic.twitter.com/5OkMzNs1KM — महा MTB (@TheMahaMTB) December 23, 2025
डॉ. व्ही. शांताराम यांचे अजरामर चित्रपटही दाखविणार
‘२२व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो आहे. गेली बावीस वर्षे या महोत्सवाने आशियाई आणि भारतीय चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट कलाकृती महाराष्ट्रातील रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. यंदा माझे वडील डॉ. व्ही. शांताराम यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या अजरामर कलाकृतींचे चित्रपट दाखवणे हा आमच्यासाठी विशेष आनंदाचा क्षण आहे’, असे आशियाई चित्रपट फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण व्ही. शांताराम म्हणाले, जगभरातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजत असलेले चित्रपट मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर शहरातील प्रेक्षकांना पाहता यावेत या उद्देशाने आशियाई फिल्म फाऊंडेशन संस्थेतर्फे थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन सन २००२ पासून करण्यास सुरुवात झाली. गेली बावीस वर्ष हा चित्रपट महोत्सव मुंबई आणि ठाण्यामध्ये आयोजित करण्यात येत आहे.
चित्रपटप्रेमींसाठी एक उत्सव
यावर्षी ५६ निवडक चित्रपटांच्या माध्यमातून आम्ही एक वैविध्यपूर्ण आणि समृद्ध सिनेमॅटिक अनुभव प्रेक्षकांना देणार आहोत. किर्गिस्तान देशातील चित्रपटांचा विशेष विभाग, मराठी आणि भारतीय चित्रपटांची स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांचे प्रदर्शन यामुळे हा महोत्सव चित्रपटप्रेमीसाठी एक उत्सव ठरणार आहेर अशी माहिती महोत्सवाचे संचालक डॉ. संतोष पाठारे यांनी दिली. आशियाई चित्रपटांबरोबरच भारतीय चित्रपट आणि मराठी चित्रपटांचा स्पर्धा विभाग हे महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे.
सई परांजपे यांना विशेष पुरस्कार
केले महोत्सवात सुप्रसिद्ध दिग्दर्शिका पद्मभुषण सई परांजपे यांना ‘आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार’ देण्यात येणार आहे. दिग्दर्शिका उमा दा कुन्हा यांना ‘सत्यजित रे स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित जाणार आहे. दिवंगत सुधीर नांदगांवकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विशेष पुरस्कार वित्रपट अभ्यासक निाक्षी शेड्डे यांना प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेले दो आँखें बारा हाथ, डॉ. कोटनीस की अमर कहानी, कुंकू, नवरंग हे चित्रपट दाखवण्यात करण्यात येणार आहेत.






