रणवीर- दीपिकाची लेक दुआचे फोटो क्लिक करून लोकांकडून पैसे उकळण्याचा उर्फीचा प्लॅन, स्वत:च केला खुलासा
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण गेल्या काही दिवसांपूर्वीच आई- बाबा झाले. दीपिकाने सप्टेंबर महिन्यात चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी अभिनेत्रीने चाहत्यांना गोड बातमी दिली. नुकतंच अभिनेत्रीने दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच लक्ष्मीपुजनच्या दिवशी चाहत्यांना लेकीचं नाव सगळ्यांनाच सुख:द धक्काही दिला. नाव जाहीर केल्यानंतर इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी दुआवर कौतुकाचा वर्षाव केला तर, अनेक चाहत्यांनीही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. पण आता अशातच रणवीर आणि दीपिकाची लेक दुआबद्दल सोशल मीडिया एन्फ्लूएंसर आणि अभिनेत्री उर्फी जावेदने केलेल्या अजब वक्तव्याचे सर्वत्र चर्चा होत आहे.
हे देखील वाचा – Good News! Athiya Shetty आणि KL Rahul होणार आई-बाबा, ‘या’ महिन्यात देणार बाळाला जन्म
तोडके- मोडके कपड्यांमुळे आणि विचित्र फॅशनमुळे चर्चेत राहणारी उर्फी सध्या तिच्या अतरंगी वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. तिने दुआबद्दल विचित्र वक्तव्य केलं आहे. एका मुलाखतीत उर्फीने असं विधान केलं आहे. नुकतीच उर्फीने इन्स्ंटट बॉलिवूडला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिने हे विधान केलंय. मुलाखतीत उर्फी तुला कोणत्या सेलिब्रिटीचे सोशल मीडिया हँडल करायला आवडेल ? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर तिने रणवीर सिंह असं उत्तर दिलं.
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री म्हणते, “मी रणवीर आणि दीपिकाच्या मुलीचे फोटो क्लिक करेल. कारण की, त्यांनी त्यांच्या मुलीचा चेहरा अजूनही रिव्हिल केलेला नाही. तर मी, तिचे फोटो काढेल आणि लोकांकडून पैसे घेईल. जर तुम्हाला दुआचे फोटो पाहायचे तर, मला पैसे द्या… असं मी त्यांना म्हणेल…” इंटरव्ह्यूमध्ये उर्फीला तृप्ती डिमरीच्या डान्सवरही प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तिने, “तृप्तीने मेरे महबुब गाण्यावर खूप घाणेरडा डान्स केला आहे. पण ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. ” अशी प्रतिक्रिया उर्फीने तृप्तीच्या डान्सवर केल्या आहेत.
लक्ष्मीपुजनच्या मुहुर्तावर दीपिका-रणवीरने लेकीची छोटीशी झलक दाखवत तिच्या नावाबाबतचा खुलासा इन्स्टाग्रामवरून केला आहे. दीपिका-रणवीरने लेकीचं नाव ‘दुआ’ असं ठेवलं आहे. अभिनेत्रीने नावाचा अर्थही चाहत्यांना सांगितला आहे. २०१८ साली दीपिका आणि रणवीरने लग्न केलं होतं. लग्नानंतर ६ वर्षांनी ते आईबाबा झाले आहेत. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटात दीपिका आणि रणवीरने एकत्र काम केलं आहे. चित्रपटाच्या शूटिंगवेळी दीपिका गरोदर होती.