दाक्षिणात्या अभिनेता विजयने देवरकोंडा (Vijay Devarkonda) नेहमी चर्चेत असतो. कधी त्याच्या प्रोफेशनल तर कधी पर्सनल लाईफमुळे त्याचं नाव चर्चेत असतं. आता पुन्हा त्याचं चर्चेत आलं आहे. ते म्हणजे त्याने जिंकलेल्या फिल्मफेअर अवार्डच्या ट्रॅाफीवरुन. विजयन त्याला पहिल्यांदा मिळालेल्या ट्रॅाफीचा लिलाव केला होता. तेव्हा अनेकांना प्रश्न पडला होता की त्याने असं का केलं. अखरे विजयन या प्रश्नाचं उत्तर दिलं असून फॅन्स त्याचं कौतुक करत आहेत..
[read_also content=”थिएटनंतर आता ओटीटीवर अनुभवता येणार ‘शैतान’ची दहशत, जाणून घ्या चित्रपट केव्हा आणि कुठे पाहू शकता! https://www.navarashtra.com/movies/ajay-devgn-and-r-madhavan-starrer-shaitaan-ott-release-date-out-as-per-report-nrps-519369.html”]
नेमका काय प्रकार
विजयला त्याच्या अभिनय कारकिर्दीतील पहिला फिल्मफेअर ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ पुरस्कार ‘अर्जुन रेड्डी’साठी ‘ (2017) मिळाला. या वादग्रस्त आणि लोकप्रिय चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे लोकांकडून खूप कौतुक झाले. या चित्रपटात विजयने साकारलेल्या व्यक्तिरेखेचे हक्क आणि चूक यावर चर्चा झाली, पण त्याच्या कामाचे सर्वांनी कौतुक केले. ण 2018 मध्ये, जेव्हा विजयने त्याच्या पहिल्या फिल्मफेअर ट्रॉफीचा लिलाव केला होता तेव्हा लोकांना धक्का बसला. विजयला त्याच्या ट्रॉफीच्या लिलावातून 25 लाख रुपयांची मोठी रक्कम मिळाली होती जी त्याने मुख्यमंत्री मदत निधीला दान केली होती. आता विजयने सांगितले की त्याने त्याच्या पहिल्या फिल्मफेअर ट्रॉफीचा लिलाव करण्याचा निर्णय का घेतला होता.
विजयसाठी पुरस्कार म्हणजे केवळ ‘दगडाचा तुकडा’
रिपोर्टनुसार, एका मुलाखतीदरम्यानं विजयने सांगितले की, तो कधीही छायाचित्रे किंवा पुरस्कार गोळा करणारा व्यक्ती नव्हता. मात्र, आपल्या आई-वडिलांची जुनी छायाचित्रे पाहिल्यानंतर आपण आपल्या मुलांसाठी अशा आठवणींचा संग्रह करावासा वाटू लागलं होतो. त्याने सांगितले की, माझ्या घरात आईने काही ट्रॅाफी सांभाळुन ठेवल्या आहेत. पण कोणत्या माझ्या आहेत आणि कोणत्या आनंदच्या (विजयचा धाकटा भाऊ, अभिनेता) आहेत हेही मला माहीत नाही. मी काही वाटल्या, एक संदीपला वंगा रेड्डीला दिली. फिल्मफेअरने दिलेल्या माझ्या पहिल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराचा आम्ही लिलाव केला. त्यातून मला चांगले पैसे मिळाले, ही माझ्यासाठी घरात ठेवलेल्या दगडाच्या तुकड्यापेक्षा चांगली आठवण आहे.
विजयचं वर्कफ्रंट
विजयच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर तो आता दिग्दर्शक परशुराम पेटला यांच्या ‘फॅमिली स्टार’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत मृणाल ठाकूर आहे आणि रश्मिका मंदान्ना यात कॅमिओ करणार आहे. ‘फॅमिली स्टार’ 5 एप्रिलला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय विजय ‘जर्सी’चे दिग्दर्शक गौतम तिन्नानुरीसोबत एक चित्रपटही करणार आहे.
Web Title: Vijay deverkonda told why he sold his first filmfare award trophy nrps