Sonakshi Sinha First Look Revealed from Upcoming Movie Jatadhara On International Womens day
अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी टॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम करताना पाहायला मिळत आहे. आता अशातच बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानेही टॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केलं आहे. आज जागतिक महिला दिन आहे आणि आजच्या दिवसाचेनिमित्त साधत अभिनेत्रीने आपल्या चित्रपटाचं पोस्टर रिलीज केलं आहे. टॉलिवूड इंडस्ट्रीतील तिच्या पहिल्या वहिल्या चित्रपटाचं नाव, ‘जटाधारा’ (Jatadhara) असं आहे. तिच्या ह्या पहिल्या चित्रपटाचं पोस्टर काही तासांपूर्वीच सोशल मीडियावर शेअर करत आलं असून तिच्या आता ह्या पहिल्या चित्रपटासाठी कमालीचे उत्सुक आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा शेवटची संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. तिने जून २०२४ मध्ये बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत गुपचूप लग्नगाठ बांधली होती. आता त्यानंतर अभिनेत्री तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. ‘जटाधारा’ या तेलुगू चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा टॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करीत आहे. सोनाक्षीचा हा महिला दिनानिमित्तचा पहिला लूक समोर आला आहे. यामध्ये अभिनेत्रीचा रुद्रावतार पाहायला मिळत असून तिच्या ह्या आगामी चित्रपटाचे प्रेक्षक कौतुक करीत आहे.
सोनाक्षी सिन्हाने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर ‘जटाधारा’ चित्रपटातील तिचा पहिला- वहिला लूक शेअर केलेला आहे. शेअर केलेल्या लूकमध्ये अभिनेत्रीचा रुद्रावतार दिसत आहे. पोस्टरमध्ये सोनाक्षीचा कधीही न पाहिलेला लूक बघायला मिळत आहे. केस मोकळे सोडून माथ्यावर टिकली लावलेली दिसत आहे. तर, तिने हातात, डोक्यावर आणि गळ्यात राणीसारखे आभूषण घातल्याचं दिसत आहे. तर हाताची लांबलचक नखं पाहायला मिळत आहेत. या लूकमध्ये सोनाक्षीच्या डोळ्यांत आग दिसत आहेत. “शक्ती आणि सामर्थ्याची ताकद” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. ‘जाटधारा’मधील सोनाक्षीचा हा लूक तिची दखल घेण्यास भाग पाडत आहे.
सोनाक्षीचा ‘जटाधारा’ चित्रपटातील हा लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत. सोनाक्षीच्या ह्या अपकमिंग चित्रपटाच्या शुटिंगला १४ फेब्रवारीपासून सुरुवात झाली आहे. झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटामध्ये सोनाक्षीसह शिल्पा शिरोडकर, रेन अंजली आणि दिव्या वीज अशी स्टारकास्ट आहे. तर वेंकट कल्याण चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.