या महिन्यात सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडिया अलीकडेच ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. या संघात ऋषभ पंतचाही समावेश आहे. दुसरीकडे उर्वशीनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितले की तीही ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. उर्वशीने फ्लाइटमध्ये बसलेले तिचे फोटो शेअर करताना याबाबत माहिती दिली. यानंतर चाहत्यांनी उर्वशीला पुन्हा ट्रोल करण्यास सुरुवात केली.
आता बॉलिवूड अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने साडी नेसली आहे आणि त्याचवेळी सिंदूरही भरलेला आहे. उर्वशी रौतेलाने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘प्रेमात असलेल्या मैत्रिणीला सिंदूरपेक्षा काहीही प्रिय नाही. सर्व विधी कराव्यात… मात्र या पोस्टमध्ये कुठेही ऋषभचा उल्लेख नाही. पण, चाहते ही पोस्ट ऋषभशी जोडत आहेत.
सोशल मीडियावर उर्वशीच्या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, ‘कृपया पंतला वर्ल्ड कपसाठी सोडा.’