महिलांना सण उत्सवाच्या दिवसांमध्ये साडी नेसायला खूप आवडते. साडी नेसल्यानंतर महिलांच्या सौदंर्य आणखीन खुलून दिसत. महिला सतत कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात किंवा इतर वेळी साडी सगळ्यात पहिली पसंती साडी नेसण्यास देतात. हल्ली नवीन साडी घेतल्यानंतर त्यावर साडीला मॅच होईल अशा वेगळ्या रंगाचा ब्लॉऊज घातला जातो. कॉन्ट्रास्ट रंगाच्या साडी- ब्लाऊजची सोशल मीडियावर मोठी क्रेझ आहे. कॉटनच्या किंवा इतर रंगाच्या साडीवर कोणत्याही वेगळा रंगाचा ब्लॉऊज घालून सुंदर लुक तयार करतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या रंगाच्या साडीवर रंगाचा सुंदर आणि आकर्षक ब्लाऊज निवडावा, याबद्दल सांगणार आहोत. हे कॅबिनेशन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा.(फोटो सौजन्य-pinterest)
कॉन्ट्रास्ट साडीवर ब्लाऊजची निवड कशी करावी

कॉटन किंवा इतर फॅब्रिकमधील निळ्या आणि हिरव्या रंगाच्या साडीवर तुम्ही डार्क गुलाबी रंगाचा ब्लॉऊज निवडू शकता. हा रंग सर्व रंगाच्या त्वचेवर उठून दिसतो.

पांढरी किंवा सोनेरी रंगाची साडी नेसल्यानंतर तुम्ही त्यावर लाल, गुलाबी, निळा किंवा हिरव्या रंगाचा ब्लॉऊज घालू शकता. हे सर्व रंग इतरही साड्यांवर उठून दिसतात.

पिवळ्या रंगाची सिल्क साडी किंवा कॉटन साडी नेसल्यानंतर तुम्ही लाल किंवा गुलाबी रंगाचा ब्लॉऊज घालू शकता. हे कॅबिनेशन खूप सुंदर दिसते.

जांभळ्या रंगाच्या साडीवर तुम्ही गुलाबी रंगाचा ब्लॉऊज परिधान करू शकता. हा रंग सगळ्यांवर उठावदार आणि आकर्षक दिसतो.

निळ्या रंगाच्या साडीवर गुलाबी किंवा लाल रंगाचा ब्लॉऊज खूप सुंदर दिसतो., हल्ली महिला साडीच्या काठाप्रमाणे किंवा साडीच्या आतील रंगानुसार ब्लॉऊज सिलेक्ट करतात.






