धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. सतत वाढलेल्या चिंतेमुळे थकवा, अशक्तपणा वाढून नैराश्य येते. यामुळे शरीरातील आनंदी हार्मोन्सच्या पातळीमध्ये झपाट्याने घट होत आहे. हार्मोन्सचे असंतुलन वाढल्यानंतर शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे नियमित ध्यान, योगासने आणि पोषक आहार घेऊन शरीराची काळजी घेणे फार गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला शरीरात सकारात्मक ऊर्जा कायम टिकवून ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर. (फोटो सौजन्य – istock)
शरीरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश, त्वचेवर टिकून राहील हास्य

डार्क चॉकलेट केवळ एक स्वादिष्ट पदार्थ नाहीतर मानसिक स्थिती सुधारण्यासाठी फार आवश्यक साधन आहे. यामध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स आणि थिओब्रोमिन एंडोर्फिन सेरोटोनिनची पातळी झपाट्याने वाढवतात.

पोषक तत्वांचा खजिना म्हणजे ॲव्होकॅडो. यामध्ये आरोग्यदायी फॅट्स, फोलेट आणि विटामिन बी ६ इत्यादी आवश्यक घटक असतात. यामुळे शरीरात डोपामाइन आणि सेरोटोनिन तयार करण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि रास्पबेरी यांसारख्या फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स खूप जास्त असतात. यामुळे शरीरातील एंडोर्फिन आणि सेरोटोनिनची पातळी वाढते आणि तुमचा मूड कायमच फ्रेश राहतो.

सॅल्मन, मॅकरेल आणि सार्डिनसारखे मासे शरीरासाठी खूप जास्त गुणकारी आहेत. हे मासे ओमेगा-३ फॅटी ॲसिड डोपामाइन आणि सेरोटोनिनची पातळी वाढवण्यास मदत करतात.

सकाळच्या नाश्त्यात नियमित दोन केळी खावी. यामध्ये पोटॅशियम आणि ट्रिप्टोफॅन इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यामुळे शरीरातील डोपामाइन आणि सेरोटोनिनची पातळी वाढण्यास मदत होते.






