सणसमारंभ, कार्यक्रम आणि विवाह सोहळ्यात सर्वच स्त्रिया सुंदर मेकअप करून छान तयार होतात. मेकअप केल्यामुळे सौंदर्यात भर पडते. पण लग्नाहुन थकुन घरी आल्यानंतर मेकअप काढण्याचा खूप जास्त कंटाळा येतो. तर काही वेळा मेकअप रिमूव्हर संपून जाते. अशावेळी मेकअप न काढता तशाच झोपुन जातात. पण यामुळे चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे मेकअप काढण्यासाठी घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करावा. यामुळे सहज निघून येतो आणि त्वचेचे कोणतेही नुकसान होत नाही. चला तर जाणून घेऊया मेकअप काढण्यासाठी काय करावे. (फोटो सौजन्य – istock)
मेकअप रिमूव्हर संपले आहे? मग 'या' पदार्थांचा वापर करून काही मिनिटांमध्ये काढा वॉटरप्रूफ मेकअप

नारळाचे तेल वॉटरप्रूफ फाउंडेशन आणि लिपस्टिक वितळवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. थोडसं तेल तळहातावर घेऊन हाताने चेहऱ्यावर हळुवारपणे मसाज करा. एकदा मेकअप वितळू लागल्यानंतर कपड्याने पुसुन घ्या.

दुध केवळ शरीरासाठी नाहीतर त्वचेसाठी सुद्धा खूप जास्त प्रभावी आहे. कच्चे दूध एक उत्कृष्ट नैसर्गिक क्लीन्झर म्हणून ओळखले जाते. कापसाचा बोळा थंड कच्च्या दूधात बुडवा आणि हळुवारपणे चेहरा व डोळ्यांवर लावून मेकअप काढून घ्या.

वॉटरप्रूफ मस्करा आणि आयलाइनर काढणे खूप त्रासदायक ठरते. यासाठी पेट्रोलियम जेलीचा वापर करावा. इअरबडवर थोडी पेट्रोलियम जेली घेऊन डोळ्यांच्या मेकअपवर हलक्या हाताने लावा.त्यानंतर कॉटनच्या कपड्याने पुसुन घ्या.

मेकअप काढण्यासाठी ऑलिव्ह किंवा बदामाचे तेलाचा वापर करावा. तेलाचे काही थेंब घेऊन गोलाकार पद्धतीने चेहऱ्यावर मसाज करा आणि त्यानंतर त्वचा सौम्य फेशवॉशचा वापर करुन पाण्याने त्वचा स्वच्छ करा.

मेकअप काढण्यासाठी कोरफड जेलचा वापर करावा. कोरफड जेल हातांवर घेऊन संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करुन घ्या.






