महाराष्ट्र सदन आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मोठी अपडेट; छगन भुजबळांचे सीए दोषमुक्त
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीमध्ये एकतर्फी निकाल लागल्यानंतर देखील अनेक मुद्द्यांवरुन नाराजीनाट्य झाल्याचे दिसून आले. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर अनेक बड्या नेत्यांचा पत्ता कट करण्यात आला. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत, दीपक केसरकर, अजित पवार गटाचे छगन भुजबळ तर भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे नाराज होते. यामध्ये छगन भुजबळ यांची नाराजीची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांनी माध्यमांसमोर आपली नाराजी व्यक्त केली असून अजित पवारांवर देखील नाराजी व्यक्त केली. तर भुजबळांच्या या नाराजीला अजित पवार यांनी मात्र कोणतेही उत्तर दिलेले नाही. या प्रकरणावरुन आता राजकारण रंगलेले दिसून येत आहे.
छगन भुजबळ हे अजित पवार यांच्यावर नाराज आहेत. अजित पवार यांनी मंत्रिपदाची संधी दिली नसल्याचे भुजबळ यांचे म्हणणे आहे. यानंतर आता या प्रकरणावर अंजली दमानिया यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यामधून त्यांनी अजित पवार व भाजपवर निशाणा साधला आहे. आज (दि.24) छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यानंतर आता अंजली दमानिया यांनी निशाणा साधला आहे.
‘ते सोबत नाही आले तर आमचाही मार्ग मोकळा’; काँग्रेसचेही स्वबळाचे संकेत
अंजली दमानिया यांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या नाराजीवर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, “आमदार रुसला आणि त्यांची समजूत काढायची गरज नाही, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले. त्यामुळे आता कुठेतरी शंकेची पाल चुकचुकली आहे. हे सगळे एक गेम प्लॅन तर नाही ना? मी फेब्रुवारी महिन्यातच म्हटले होते की छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर आहेत. तेव्हा भुजबळ म्हणाले होते, असे काहीच नाही. माझा असा काही विचार नाही. त्यामुळे आता ‘नक्की दाल में कुछ काला है’,” असे वाटत आहे, असे अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.
अंजली दमानिया पुढे म्हणाल्या की, “ओबीसी नेता भाजपमध्ये हवा म्हणून कदाचित हे छान नाटक रंगवले गेले आहे. त्यांना मंत्रीपद द्यायचे आहे. आता भुजबळ म्हणतील, कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की त्यांनी भाजपमध्ये जावे, असे दाखवले जाईल. त्यानंतर त्यांना देवेंद्र फडणवीस आपला पक्षात घेतील. सगळे त्यांचे कुठेतरी एक छान रंगवलेला नाटक आहे, असेच मला वाटते,” असा मोठा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. तसेच भुजबळ यांनी देखील मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
स्वबळावर लढण्याचा नारा देत ठाकरे गट पडला आघाडीतून बाहेर; खासदार सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया
बीडच्या घटनेवर बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, “वाल्मीक कराड यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. मला काही लोकांकडून आणि काही पत्रकारांकडून काही व्हिडिओज मिळाले. त्यात वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते असल्याचे स्पष्ट होते. तसेच त्यांच्या हातात पिस्तूल होता. पंकजा मुंडे या सगळ्या घटनेबद्दल काहीच का बोलत नाही, याबद्दल आपणास आश्चर्य वाटत आहे. बीडची एवढी मोठी घटना झाली आणि बीडच्या मंत्र्यांनी त्याच्याबद्दल काही चकार शब्द काढू नये? आज पंकजा मुंडे कुठच्या बाजूने आहेत. त्या वाल्मीक कराड याच्या बाजूने आहेत की त्यांच्याविरुद्ध आहेत हे त्यांनी जाहीर करावे,” असा घणाघात अंजली दमानिया यांनी केला आहे.