गृहमंत्री अमित शहांचा विरोधकांवर हल्लाबोल (Photo Credit- X)
Bihar Election 2025: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकार पुन्हा एकदा ऐतिहासिक जनादेशासह सरकार स्थापन करेल, असा विश्वास व्यक्त केला. शहा म्हणाले की, नितीश कुमार यांनी गेल्या २० वर्षांत राज्याला “जंगल राज” पासून मुक्त केले आहे. सारण जिल्ह्यात एका जाहीर सभेला संबोधित करताना अमित शहा यांनी विरोधकांवर, विशेषत: राष्ट्रीय जनता दलावर (RJD) सडकून टीका केली.
शहा म्हणाले, “मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गेल्या २० वर्षांत बिहारला जंगल राजातून मुक्त केले आहे.” “जर माध्यमांनी बिहारमधील वातावरणाबद्दल विचारले, तर मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की एनडीए बिहारमध्ये बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत आणि देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीएचे नेतृत्व करत आहेत.”
दिवंगत डॉन शहाबुद्दीनच्या मुलाचे नाव आरजेडीच्या यादीत असल्याचा उल्लेख करत शहा म्हणाले, “असे लोक राज्याचे रक्षण करू शकत नाहीत. जनतेने त्यांच्यापासून सावध राहावे.” सारणच्या लोकांना जंगलराज परत येऊ नये यासाठी आरजेडीला एकही जागा जिंकू न देण्याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
बिहार में जंगलराज वापस न आए, इसलिए युवाओं को उसकी याद दिलाना जरूरी है। pic.twitter.com/5lcX3RwRa3 — Amit Shah (@AmitShah) October 17, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील कामगिरीचा उल्लेख करताना अमित शहा म्हणाले, “संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) सरकारच्या काळात, दहशतवादी देशभरात रक्ताने होळी खेळत होते, परंतु पहलगाम हल्ल्यानंतर मोदीजींनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले.” यासोबतच, मोदीजींनी अयोध्येत राम मंदिराची पुनर्बांधणी केली आणि जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवले, असेही त्यांनी नमूद केले.
अमित शहा यांनी यंदा बिहारमध्ये चार दिवाळी साजरी होत असल्याचा दावा केला:
अमित शहा यांनी त्यांच्या विधानावर (नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील की नाही, याबद्दलच्या) झालेल्या गोंधळानंतर लगेच पाटणा येथील नितीश कुमार यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीत निवडणूक रणनीती आणि प्रचारावर चर्चा झाली.
भाजप आणि जनता दल (संयुक्त) बिहारमध्ये प्रत्येकी १०१ जागा लढवत आहेत. तर चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पक्षाला २९ जागा मिळाल्या आहेत. २४३ सदस्यांच्या विधानसभेसाठी ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यांत मतदान होणार असून, मतमोजणी १४ नोव्हेंबर रोजी होईल.