कोकणात भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता (फोटो- सोशल मीडिया)
खेड नगरपरिषदेवर भाजपाचा झेंडा फडकेल- माजी आमदार सूर्यकांत दळवी
भाजपा दापोली विधानसभा आढावा बैठकीत निर्धार
राज्यात लवकरच होणार निवडणुका
खेड: खेड नगर परिषदेवर भाजपचा झेंडा वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच फडकेल. सध्याच्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी कग्रिस (अजित पवार गट) सोबत घेणे गरजेचे आहे’, असे प्रतिपादन माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी केले. भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी-दापोली विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक खेड येथील द. ग. तटकरे सभागृहात पार पडती. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश मोरे, केदार साठे, वैभव खेडेकर, ऋषिकेश मोरे, विनोद चाळके, अनिकेत कानडे, संजय बुटाला आदी मान्यवर उपस्थित होते.
अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांचा प्रवेश
माजी आमदार दळवी म्हणाले, खेडच्या विजयासाठी दापोली व महगगडमधील कार्यकर्ते मदतीला येणार आहेत. प्रत्येक निवडणुकीत आपले अस्तित्व दाखवायचे आहे. साध्या युतीचे धोरण फक्त मुंबई आणि ठाण्यात जाहीर झाले आहे. तरीदेखील आपण विजयासाठी प्रयत्नातील राहिले पाहिजे.
प्रस्तावित वसाहत ३५ वर्षे रखडली
ते पुढे माणाले, शिवसेना शिंद गटाने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यांनी ताकद दाखवायची ठरकली तर आपणही ताकद दाखवून द्यायची आहे. मंडणगडातील सोवेली पंचक्रोशीत प्रस्तावित औद्योगिक वसाहत गेली ३५ वर्षे रखडली आहे. ती पूर्ण न झाल्यास ती रद्द करून जमिनी लोकांना परत द्याव्यात.
Ajit Pawar : वसईकर, कुठे जाऊन बसता तुम्ही? अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झापलं
कार्यकर्त्यांतील नव्या ऊर्जेने माहोल गेला भारून
बैठकीदरम्यान जिल्हाध्यक्ष सुरेश मोरे वानी कार्यकत्यांना आवाहन केले की, जिल्हा परिषद पंचायत समिती अणि नगर परिषद निवडणुकीत अधिकाधिक उमेदवार विजयी करून आणण्याचे भाग्य मला मिळवून या. यासाठी सर्व कार्यकत्यांनी एकदिलाने प्रयत्न करावेत.” बैठकीचा संपूर्ण माहोल विजयाच्या निर्धाराने आणि कार्यकत्यांतील सथा ऊर्जेने भारलेला दिसून आला.
अजित पवारांची आमदारांना तंबी
येत्या काही दिवसांत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या निवडणुका महायुतीबरोबर लढणार की स्वतंत्र, याबाबतची चाचपणी सुरू झाली आहे. मात्र, पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील सर्व आमदारांना कठोर तंबी दिली असून, मुंबईत थांबू नका, मतदारसंघात जाऊन कामाला लागा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
Maharashtra Politics: महायुती फुटणार? “कोणाच्या भरवशावर…”; अजित पवारांची आमदारांना तंबी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवार यांनी पक्षाच्या तयारीवर भर दिला. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. कोणाच्या भरवशावर अवलंबून राहू नका. विनाकारण मुंबईत राहू नका, मतदारसंघात पक्षाचे काम करा,” अशा सूचना त्यांनी दिल्या.






