डोंबिवलीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस जेष्ठ नेते मामा प्रकाश पगारे यांना साडी नेसवली (फोटो -सोशल मीडिया) )
Mama Prakash Pagare Saree News : डोंबिवली : राज्यातील राजकारणाचा स्तर दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. राजकीय नेते देखील एकमेकांवर जोरदार टीका करत असतात. ही टीका करताना वैयक्तिक आयुष्य, कुटुंबावरुन खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते. असाच काहीसा प्रकार डोंबिवलीमध्ये देखील घडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला साडी नेसवून त्याचा फोटो कॉंग्रेस नेत्याने सोशल मीडियावर शेअर केला. यामुळे भाजप नेत्यांचा देखील स्वाभिमान दुखावला. यानंतर त्या कॉंग्रेस नेत्याला भाजप कार्यकर्त्यांनी भर रस्त्यामध्ये शालू नेसवला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून यावरुन सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले.
डोंबिवलीमधील जेष्ठ कॉंग्रेस नेते मामा उर्फ प्रकाश पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला साडी नेसवली होती. त्यांनी मोदींच्या प्रतिमेला लाल साडी परिधान करुन त्यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. याला मी कशाला आरशात पाहू गं..मीच माझ्या रुपाची राणी गं..हे गाणे लावले होते. हा फोटो तुफान व्हायरल झाला. यामुळे आक्रमक झालेल्या डोंबिवली भाजप कार्यकर्त्यांनी प्रकाश पगारे यांना साडी भर रस्त्यामध्ये गाठून त्यांना भरजरी शालू नेसवला. मात्र यावरुन राज्यातील राजकीय टीकेचा स्तर किती खालावला आहे हे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मामा उर्फ प्रकाश पगारे यांच्या कृतीनंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, मंडल अध्यक्ष करण जाधव, भाजप नेते संदीप माळी, दत्ता माळेकर आणि इतर नेते यांनी आक्रमक भूमिका घेतली. मामा उर्फ प्रकाश पगारे हे डोंबिवलीमध्ये राहतातय. सकाळच्या सुमारास ते घराबाहेर पडत होते यावेळी त्यांना मानपाडा परिसरामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी गाठले. ही माहिती भाजप नेत्यांनी रात्रीच गुप्त पद्धतीने काढून ठेवली होती. यानंतर मामा पगारे यांना सकाळी भररस्त्यामध्ये साडी नेसवण्याचा निर्णय भाजप कार्यकर्त्यांनी घेतला. भाजप कार्यकर्त्यांनी तब्बल पाच हजार किंमतीचा भरजरी शालू कापड दुकानातून खरेदी केला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यानंतर सकाळच्या सुमारास मामा उर्फ प्रकाश पगारे यांना मानपाडा परिसरामध्ये गाठले. मामा पगारे पांढरा शुभ्र सदरा, विजार आणि लख्ख पॉलिश केलेले काळे बूट घालून होते. पगारे यांना पाहताच भाजप पदाधिका-यांनी मामा पगारे यांचे दोन्ही हात पकडले. संदीप माळी आणि माळेकर यांनी मामा पगारे यांना शालू नेसविण्यास सुरूवात केली. यावेळी गांगारुन गेलेल्या मामा पगारे यांना दोन मिनिटे काय सुरु आहे हे लक्षात आले नाही. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांना शालू नेसवण्यास सुरुवात केली.
Dombivli – On Monday, senior Congress leader Mama alias Prakash Pagare from Dombivli circulated on social media an image of Prime Minister Narendra Modi draped in a red saree. This sparked intense anger among BJP office-bearers in Dombivli. pic.twitter.com/uTs1rrNCup — Simran Kaur (@Simrankaur2020) September 23, 2025
अरे तुम्ही हे काय करत आहात.. असे देखील कॉंग्रेस जेष्ठ नेते मामा उर्फ प्रकाश पगारे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना विचारले. मात्र यानंतर देखील भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी थांबले नाहीत. त्यांनी पगारे यांना साडी नेसवली. यानंतर त्यांना गालगुच्छ देखील दिला. यावेळी पुन्हा असे काही करु नका असा सल्ला देखील भाजप पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांना दिला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यावर उलट सुलट प्रतिक्रिया दिल्या आहेत.