मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - सोशल मीडिया)
CM Fadnavis on Malegaon blast verdict : नागपूर : मालेगावमधील भिक्कू चौक येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. नाशिक जिल्ह्यातील हा स्फोट नवरात्री आणि रमजान महिन्याच्या पूर्वसंध्येला होता. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि 100 जण जखमी झाले होते. या प्रकरणाचा तब्बल 17 वर्षानंतर निकाल हाती आला आहे. यामधील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यामुळे भाजप नेत्यांनी आता दहशतवादाला धर्मावरुन लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईतील विशेष न्यायालयाने या प्रकरणाबाबत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. यामधील सर्व आरोपींची निर्दोषपणे मुक्तता करण्यात आली आहे. यात भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह ७ आरोपींचा समावेश होता. याप्रकरणी न्यायालयाने केवळ संशयाच्या आधारावर कुणालाही शिक्षा देता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिले. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर मंत्री नितेश राणे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर मुंबई विशेष न्यायालयाने निकाल दिला आहे. यामध्ये सर्व आरोपींची निर्दौष मुक्तता करण्यात आली. यानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिले आहे की, दहशतवाद भगवा कधीच नव्हता, आहे आणि कधीही राहणार नाही! अशी सूचक प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
आतंकवाद भगवा न कभी था, ना है, ना कभी रहेगा!#MalegaonVerdict
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 31, 2025
भाजप नेत्यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. यामधील सर्व भाजप नेते, माजी खासदारांची सुटका झाल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, या मालेगावच्या प्रकरणातून समाजाची जी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला होता त्यांच्या तोंडावर चपराक बसली आहे. त्यामुळे यापुढे हिंदू समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न करु नये. परत परत एकच विषय सिद्ध होतो आहे की आतंकवादाचा रंग आणि जिहादाचा रंग हा हिरवाच आहे, अशी गंभीर शब्दांत मंत्री नितेश राणे यांनी मालेगाव प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “कॉंग्रेस काळामध्ये हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल करण्यात आल्या. त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हिंदुत्ववादी विचारसरणीचे राज्य आणि केंद्र सरकार असताना मात्र हे शक्य नाही. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमचा हिंदू सुरक्षेत आहे हे पुन्हा सिद्ध झालंय. खरंतर या लोकांनी हिंदू समाजाची माफी मागितलं पाहिजे. यांनी मंदिरात जाऊन हिंदू समाजाची माफी मागावी,” अशी मागणी देखील मंत्री नितेश राणे यांनी लगावला आहे.