KDMC: ऐन निवडणुकीत कल्याणमध्ये बेकायदा होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर; KDMC कडून मात्र संथगतीने कारवाई
विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठिकठिकाणी प्रचार सभा आणि बॅनरबाजी करण्यात येत आहेत. मात्र निवडणुकांना काही दिवस बाकी राहिले असतानाच कल्याणमधील वातावरण संवेदनशील झाल्याचं पाहायला मिळत आहे. शनिवारी काही अज्ञातांनी राकेश मुथा यांच्या बॅनरची विटंबना केली. याचे तीव्र पडसाद कल्याण आणि कल्य़ाण ग्रमीण भागात पाहायला मिळत आहेत.
विधानसभेच्या प्रचारादरम्यान सर्वच पक्षांकडून बॅनरबाजी होत आहे. मात्र राकेश मुथा यांच्या बॅनरची विटंबना केल्याप्रकरणानंतर आता पालिकेने कारवाई सुकु केली आहे. कल्याण डोंबिवलीत निवडणूकीच्या पाश्वभूमीवर होर्डिंग, बॅनर ,झेंडे लावण्यात आले आहेत. मात्र यामध्ये बेकायदेशीरपणे लावलेल्या होर्डिंग ,बॅनर आणि झेंड्यामुळे शहराचे विद्रूपीकरण सुरु आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात निवडणूक पर्यवेक्षकाने रस्त्यावर, चौकात, विद्युत खांबावर लावण्यात आलेले बेकायदेशीर बॅनर होर्डिंग झेंडे काढण्याचे आदेश निवडणूक निर्णयन अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यानुसार अधिकाऱ्यांनी ही बाब महापालिका प्रशासनास कळविली आहे. महापालिकेने बॅनर ,होर्डिंग आणि झेंडे काढण्याची कारवाई केली आहे. याचपार्श्वभूमीवर मनपा प्रशासनावर गंभीर आरोप देखाील केले जात आहेत. महापालिकेकडून बेकायदा होर्डिंग, बॅनर, झेंडे काढण्याची कारवाई केली जात नाही असं राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
कल्याण ग्रामीण मतदार संघात निवडणूकीच्या प्रचाराचा रंग चढला आहे. प्रचार अंतिम टप्प्यात असताना मतदारसंघात विविध राजकीय पक्षाच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनी त्यांच्या प्रचारासाठी बडे होर्डिंग, बॅनर आणि झेंडे लावले आहे. यामध्ये बहुतांश हाेर्डिंग, बॅनर आणि झेंडे हे बेकायदेशीर आहे . बेकायदेशीर होर्डिंग बॅनर आणि झेंडे काढण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या प्रकरणी कल्याण ग्रामीण मतदार संघाचे निवडणूक निरिक्षक कुमार पुरुषोत्तम यांच्याकडे यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या. याबाबत कल्याण ग्रामीण मतदार संघाचे निवडणूक निर्णयन अधिकाऱ्यांकडे लेखी पत्र देऊन विचारणा केली.
महायुतीसंदर्भात बातम्यांसाठी इथे क्लीक करा
निवडणूक निर्णयन अधिकारी गुजर यांनी निवडणूक निरिक्षक कुमार पुरुषोत्तम यांच्या पत्राची गंभीर दखल घेत महापालिकेस यासंदर्भात विचारणा केली. महापालिकेने या प्रकरणी काय कार्यवाही केली याचा लेखी अहवाल त्यांनी दिला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसात महापालिका प्रसासनाने 7 हजार 408 बॅनर, 654 होर्डिंग आणि 8हजार 213झेंडे काढण्याची कारवाई केली आहे. ही कारवाई गेल्या तीन दिवसातील आहे. 20तारखेला मतदान आहे. येत्या तीन दिवसात बेकायदा होर्डिंग बॅनर आणि झेंडे यांच्या विरोधातील कारवाई अधिक गतीमान करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. बेकायदा होर्डिंग, बॅनर, झेंडे लावणाऱ्यांच्या विरोधात कारवाईसाठी विलंब करु नये, असे आदेश निवडणूक आयोगाने पालिकेला दिले आहेत.