LPG गॅस दरवाढीवरून रोहित पवार सरकारवर संतापले
गेल्या काही दिवसांपासून अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होताना दिसत आहे. अमेरिका – इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभारत इंधन तुटवडा आणि दरवाढ करण्यात आली होती. त्यातच आता महागाईचा सर्वसामान्यांना आणखी एक फटका बसला आहे. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस (LPG) सिलेंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हे नवीन दर आज ७ जूनपासून लागू झाले आहेत. या दरवाढीनंतर, दिल्लीत १४.२ किलोच्या घरगुती LPG सिलेंडरची किंमत ₹९१३ वरून ₹९४२ होणार आहे. यावरून आता राजकीय नेत्यांकडून सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून केंद्र सरकारला चांगलेच फैलावर घेतले आहे. “देशातील प्रादेशिक पक्ष फोडण्यात व्यस्त असलेल्या सरकारला बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढणारी महागाई मात्र दिसत नाही,” अश्या शब्दांत रोहित पवारांनी सरकारवर आगपाखड केली आहे.
अमेरिका – इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभारत इंधन तुटवडा आणि दरवाढ करण्यात आली होती. आता याचा फटका घरगुती LPG सिलेंडरवरदेखील पडत असल्याचे दिसत आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही LPG गॅसवरील दुसरी दरवाढ आहे. यापूर्वी ७ मार्च रोजी प्रति सिलेंडर ६० रुपयांची दरवाढ झाली होती. त्यानंतर आता पुन्हा दरवाढ केली गेली आहे. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मार्चमध्ये ६० रुपयांची दरवाढ होऊनही, तेल विपणन कंपन्यांना घरगुती एलपीजी विक्रीतून तोटा होत होता. या दरवाढीपूर्वी, सरकारी तेल कंपन्यांना प्रत्येक घरगुती LPG सिलेंडरमागे अंदाजे ७०३ रुपयांचा तोटा होत होता. त्यामुळे, वाढता खर्च लक्षात घेता, दरवाढ करणे आवश्यक होते. त्यानुसार, दरवाढ केल्याचे सांगण्यात आले.
Free Ration Scheme : 63 लाख नागरिकांचे मोफत रेशन थांबणार? ‘या’ सरकारच्या निर्णयाने मोठी खळबळ
रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ते यावेळी म्हणाले, “पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करुन महागाईचा भडका केल्यानंतर आता सरकारने घरगुती सिलिंडरच्या दरातही २९ रुपये वाढ करुन सामान्य माणसाच्या ताटातील जेवणही महागाईच्या आगीत करपून टाकलं. बेरोजगारी वाढत आहे, शेतमालाला भाव नाही आणि देशातील प्रादेशिक पक्ष फोडण्यात व्यस्त असलेल्या सरकारला बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढणारी महागाई मात्र दिसत नाही, हे दुर्दैव आहे. सामान्य माणसाच्या जीवावर उठलेलं हे निर्दयी आणि निष्ठूर सरकार असून महागाईच्या भडक्यात भाजून निघालेल्या जनतेची जेंव्हा माथी भडकतील तेंव्हा या सरकारलाही पोळल्याशिवाय राहणार नाही.”
पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करुन महागाईचा भडका केल्यानंतर आता सरकारने घरगुती सिलिंडरच्या दरातही २९ रुपये वाढ करुन सामान्य माणसाच्या ताटातील जेवणही महागाईच्या आगीत करपून टाकलं. बेरोजगारी वाढत आहे, शेतमालाला भाव नाही आणि देशातील प्रादेशिक पक्ष फोडण्यात व्यस्त असलेल्या सरकारला बुलेट… pic.twitter.com/uUfH2hoTyC — Rohit Pawar (@RRPSpeaks) June 7, 2026
“विशिष्ट उद्योजक-व्यावसायिकांसाठी काम करणाऱ्या या सरकारला गॅस दरातील वाढीमुळं काहीही फरक पडत नसला तरी सामान्य माणसाचं जगणं मात्र कठीण होतंय याची जराही जाणीव नाही. निवडणुकीत ‘बहुत हुयी महागाई की मार’ अशा जाहिरातींचा मारा करुन सत्तेत आलेलं हे सरकार आता ‘शॉर्ट-टर्म मेमरी लॉस’चं शिकार झालंय की मुळातच हे विश्वासघातकी सरकार आहे, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही,” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
LPG Price Hike : घरगुती सिलेंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ; ‘इतक्या’ रुपयांनी महाग झाला गॅस






