भारतात आयफोन उत्पादन थांबवण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांची टीका (फोटो - सोशल मीडिया)
ठाणे : भारत आणि पाकिस्तान युद्धामध्ये मध्यस्थी केल्यानंतर अमेकितेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतातबाबत अनेक वक्तव्य करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यावर वक्तव्य केल्यामुळे राजकारण तापले होते. यानंतर ट्रम्प यांनी आयफोन बनवणारे ॲपल कंपनीला भारतामध्ये प्रोडक्शन करण्याची गरज नाही. भारत त्याची काळजी स्वतः घेऊ शकतो असे म्हणत धमकीवजा सल्ला दिला. यावरुन आता टीका होत असताना शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी आव्हाड म्हणाले की, “डोनाल्ड ट्रम्प यांनी ऍपल चे CEO यांना सांगितले की भारतात थांबायची काही गरज नाही. ऍपलची बाजारपेठ ही भारतात मोठी आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पने असे सांगणे धक्कादायक आहे. डोनाल्ड ट्रम्प हे नक्की भारताचे मित्र आहेत की शत्रू आहेत? आपले हित जोपासण्याचे काम डोनाल्ड ट्रम्पने ट्रम्प करत नाहीये,” असे स्पष्ट मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “भारतात ज्या बाजारपेठ असतात त्या भारतातले उत्पादन हे सगळ येत असताना एका राष्ट्राध्यक्षांनी भूमिका घेणे ही मुत्सद्देगिरी म्हणता येईल. त्यांच्या कंपनीला नुकसान आहे. युरोप आणि भारताची बाजारपेठ हे एकच आहेत. भारताकडे धन आणि धान्य मुबलक प्रमाणात आहे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. हे दादागिरी करून छोटा राजन यांचे फोन करून जे राजकारण करत आहेत हे लहानापासून करतोय,” असा टोला देखील जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.
खासदार संजय राऊत यांचे नरकातला स्वर्ग हे पुस्तक लवकरच प्रकाशित केले जाणार आहे. यामध्ये संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यांमुळे आता राजकारण तापले आहे. यामध्ये त्यांनी भाजप नेते आणि अमित शाह यांच्याबाबत केलेल्या दाव्यावरुन भाजप नेते देखील आक्रमक झाले आहे. यामुळे नरकातील स्वर्ग पुस्तक प्रकाशनाच्या आधीच वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहे. यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “ज्यावेळी हे घडले त्यावेळी मी फार छोटा कार्यकर्ता होतो, त्यामुळे तेव्हा काय झाले ते मला सांगता येणार नाही, आणि ज्यांना हे माहित आहे त्यांनी ते लिहिले, यावर आता मी काय बोलणार,” असे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले की, महापालिकेने सुविधा दिली आहे त्यामुळे आम्ही जनता दरबार घेणार आहोत. सर्वांनी जनता दरबार घ्यावे, असा आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.