Assembly Election : नाही तर मी सगळ्यांच्या कुंडल्या बाहेर काढेल; नितेश राणें यांचा निरोधकांवर पलटवार
कणकवली/ भगवान लोके: विधानसभा निवडणूकीचे वारे राज्यात वाहत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीचा लढत पाहायला मिळत आहे. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप करणं सुरुच आहे. अशातच आता नारायण राणेंनी विरोधकांवर परखड शब्दात टीका केली आहे. विरोधकांना खडेबोल सुनावताना राणे म्हणाले की, नितेश राणेंनी कोणाकोणाला अर्ज भरायला लावलेला आहे, असा संशयाचा काढला जात आहे. त्याच्याबद्दल माझ्या प्रतिस्पर्धींनी कमी बोलले तर बरं आहे नाहीतर सर्वांच्या कुंडल्या बाहेर निघाल्या तर त्या त्या पक्षाचे प्रमुख त्यांना काय जागेवर ठेवणार नाहीत , ते लक्षात ठेवावे. अपक्ष उमेदवार खानी प्रमाणे संदेश पारकरांना देखील त्याच चौकटीत बसवले पाहिजे असा टोला . नितेश राणे यांनी आपले नामनिर्देश पत्र वैध ठरल्यानंतर लगावला.
राणे म्हणाले की , मी 2014 आणि 2019 मध्ये निवडणूक लढवलेल्या आहेत. मी कधीही माझ्या विरोधकांना कमी लेखत नाही. किंबहुना त्यांच्यावर कधीही वैयक्तिक टीका टिपणी करत नाही. आणि जे उत्तर तुम्हाला द्यायचा आहे. ते माझे मतदार 23 तारीखला देतील. निवडणुकीची पूर्ण तयारी झालेली आहे ,ज्या काही निवडणूक आयोगाच्या अपेक्षा असतात, जे काही नियम दिलेले आहेत, त्या नियमानुसार आम्ही लढतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आपल्या सर्वांचा विश्वास असल्यामुळे आम्ही ही निवडणूक संविधानाचे अंतर्गत आणि त्याचा मान ठेवून सर्वजण लढतो आहोत. माझी ही निवडणूक माझ्या कणकवली, देवगड, वैभववाडी ची जनता लढते आहे. तुमच्या विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर माझे मतदार तुम्हाला 23 तारखेला देतील , कारण प्रत्येकाच्या घरातला सदस्य म्हणून मी गेली दहा वर्ष वावरलेलो आहे. त्यामुळे माझ्या विरोधी उमेदवारावर वैयक्तिक टीका करणार नाही.
हेही वाचा-आचारसंहिता म्हणजे काय? आचारसंहितेच्या काळात नेमके काय करावे आणि काय करु नये ?
दरम्यान विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली विधानसभा मतदार संघाच्या तयारीचा प्रत्यक्ष पाहणी केली आहे . विधानसभा निवडणूक प्रक्रिया त्याचप्रमाणे उमेदवारी अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया, स्ट्रॉंग रूम, त्या ठिकाणाहून इव्हीएम मशीन व व्हीव्ही पॅड केंद्रावर नेण्याची प्रक्रिया, मतदान झाल्यानंतर परत इव्हीएम मशीन कोठे ठेवल्या जाणार? त्याची व्यवस्था कशी असणार? त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे ? या सर्व गोष्टींचा आढावा यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी घेतला. मतमोजणीची प्रक्रिया कशी चालणार ? त्यासाठी कशा पद्धतीने यंत्रणा लावण्याचे नियोजन करण्याच्या सुचना निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांना देण्यात आल्या. मतदान क्रेंद्राबाबत 332 ठिकाणी मतदान होणार आहे. याबाबत योग्य निजोजन करा. जेणेकरुन सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येईल. त्यादृष्टीने नियोजन आवश्यक असल्याचे श्री. पाटील यांनी म्हटले आहे.