"राजन तेली गेल्याने महायुतीला कोणताही फरक पडणार नाही", नितेश राणे यांचं वक्तव्य
भगवान लोके/ कणकवली: भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सडकून टीका केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचा महायुती सरकारवर विश्वास आहे.उद्धव ठाकरे थेट महायुतीबद्दल बोलू शकत नाही. त्यामुळे आमचीच माणसं फोडून आमच्या विरोधात उभा करण्याचा षडयंत्र ठाकरे रचत आहेत.
महायुती विरोधात लढायला ठाकरे सेनेत कोणीच नव्हते का? असा सवाल राणेंनी उपस्थित केला आहे. बाबुराव धुरी, रुपेश राऊळ यांच्यासारख्या निष्ठवंतावर ठाकरे सेनेने अन्याय केला असा नाव न घेता नितेश राणे यांनी विरोधकांना टोला लगावला.उद्धव ठाकरे थेट राणेंवर बोलू शकत नाही. त्यामुळे आमचीच माणसं फोडून आमच्या विरोधात उभा करण्याचा षडयंत्र ठाकरे रचत आहेत. मात्र , त्यांनी कितीही पाळीव प्राणी आमच्यावर सोडले, तरी आम्हाला फरक पडत नाही. आमची महायुती सावंतवाडीत भक्कम आहे. महायुती विरोधात लढायला ठाकरे सेनेत कोणीच नव्हते का? बाबुराव धुरी, रुपेश राऊळ यांच्यासारख्या निष्ठवंतावर ठाकरे सेनेने अन्याय असल्याचा टोला नाव न घेता आमदार नितेश राणे यांनी विरोधकांना टोला लगावला.
हेही वाचा- ‘अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून मी भाजपा सोडतो; भाजप प्रवक्ता व माजी मंत्री हाती घेणार तुतारी
दरम्यान राजन तेलींच्या पक्षप्रेवशाबाबत राणेंना काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर स्पष्टीकर देत राणे म्हणाले की, दर पाच वर्षानंतर असे प्रवेश कोणी ना कोणी करतच असतं . पहिले परशुराम उपरकर होते, सतिश सावंत होते आता हे राजन तेली आहेत. सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्गमध्ये असा एकही उमेदवार नाही,जो आमच्या महायुतीच्या उमेदवाराला हरवू शकेल. ठाकरेंनी कितीही पाळीव प्राणी सोडू दे महायुती भक्कम आहे. बाबुराव धुरी व रुपेश राऊळ सारख्या निष्ठावंतांवर ठाकरे गटाने अन्याय केला आहे, असं विधान आमदार नितेश यांनी केलं आहे.
हेही वाचा- रात्री डेअरीमध्ये दरवाजा बंद करुन झोपले, अचानक आग लागली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
एक कडवट शिवसैनिक नाही. जो महायुतीच्या उमेदवारासोबत लढू शकतो. हे खरंतर आश्चर्याची गोष्ट आहे. उद्धव ठाकरेनी त्यांचे कितीही पाळीव प्राणी आमच्याकडे सोडले तरी त्याचा आमच्यावर फरक पडणार नाही, त्याची आम्हाला सवय झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष हा भक्कम आहे. भारतीय जनता पक्षाला उद्धव ठाकरे यांनी फ्लावर समजलं काय आम्ही फायर आहोत हे उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवावं असा इशारा देखील आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना दिला.