सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुका लवकरच होणार आहेत. राजकीय नेत्यांचे विविध भागात दौरेही वाढले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही दिले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शदर पवारांच्या राष्ट्रवादीच्या पुणे शहर उपाध्यक्ष अनिता पवार यांनी पुणे शहरातील अनेक मुद्द्यावर नवराष्ट्रसोबत संवाद साधला. पुण्यात महापौर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाच होणार असाही विश्वास यावेळी अनिता पवार यांनी व्यक्त केला.
अनिता पवार म्हणाल्या, मी पक्ष संघटनेसोबतच सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. निवडणुका जवळ आल्या असल्या तरीही भिती अजिबात वाटत नाही. कारण मी शिवाजीनगर भागात खूप काम केलेले आहे. त्यामुळे जनता मला निवडून देणार, असा विश्वास आहे. शिवाजीनगर भागात मी महिलांचं संघटन वाढवलं आहे. या भागात अनेक शिबिरही घेतली, याची दखल जयंत पाटील यांनी भरसभेत घेतली होती, असंही अनिता पवार यांनी यावेळी सांगितलं.
शिवाजीनगर भागात विधवा महिलांचं प्रमाण खूप आहे. विधवा म्हटलं की, त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा जो दृष्टीकोण असतो तो महिलांना हवा तसा नसतो, कोरोना काळात एका संस्थेने मला मदत केली होती. साधारण ३०० धान्याचे कीट दिले होते. मी ते कीट विधवा महिलांना वाटप केले. विधवा महिलांना मान मिळावा यासाठी मी अनेक कुटुंबानाही विनंती केली. याला नागरिकांचा मला मोठा प्रतिसाद मिळाला होता. कारोना काळतही अनेक नागरिकांना माझ्या माध्यमातून मदत झाली, असंही यावेळी अनिता पवार म्हणाल्या. समाजासाठी काम करायच म्हणून मी मदत केली, राजकारण डोळ्यासमोर ठेवून मी कधीही नागरिकांना मदत केली नाही, असंही अनिता पवार यांनी सांगितलं.
पुढे बोलतांना पवार म्हणाल्या, माझा प्रभाग आर्थिकदृष्ट्या मागास आहे. वैचारिकदृष्ट्याही मागास आहे. नवीन पिढीला ज्ञान असले तरीही हवं तसं पुरक नाही. त्यामुळे माझा कल आरोग्य, व्यवसाय, शिक्षण, महिलांना काही तरी काम मिळाव, हे माझं व्हिजन आहे, असं अनिता पवार यांनी सांगितलं. महिलांना समाजात मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे, असंही त्या म्हणाल्या.
सरकारचे ते धोरण चुकीचे
वाढत्या गुन्हेगारीविषयी बोलतांना अनिता पवार म्हणाल्या, वाढती व्यसनाधिनता आणि बेरोजकारी आणि सरकारने केलेले ८ वी पासपर्यंतचे धोरणे हे चुकीचे आहे, यामुळेच लहान मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. युवा पिढी जर मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकडे वळत आहे तर तुम्ही करताय काय असा सवाल पवार यांनी सरकारला विचारला. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे, पूर्वी आम्ही बिनधास्तपणे रस्त्यावर फिरायचो, पण आता तसे आता राहिले नाही, त्यामुळे सरकारने गुन्हेगारी थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असंही अनिता पवारांनी सांगितलं.






