मनसे राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे युतीवर संजय राऊत यांचे सूचक विधान (फोटो - टीम नवराष्ट्र)
मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबत निर्देश दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे. मागील अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे युती करणार असल्याच्या चर्चा असल्यामुळे मराठी मने सुखावली आहेत. याबाबत आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुचक विधाने केले आहेत. तसेच राज-उद्धव यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाली असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनसे-ठाकरे गट युतीवर महत्त्वपूर्ण वक्तव्य केली आहेत. खासदार राऊत म्हणाले की, “आम्ही सकारात्मक आहोत म्हणून खाली कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू आहे तुम्ही हे समजून कसं घेत नाही. नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढलं आहे. आम्ही सकारात्मक आहोत राज ठाकरे सकारात्मक आहेत त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत अत्यंत सकारात्मक असल्यामुळे जमिनीवरच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच मनोमिलन झाल असेल तर त्याच्यामध्ये चिंतेचा कारण काय?” असे म्हणत संजय राऊत यांनी युतीला हिरवा कंदील दाखवला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जसा आदित्य तसा अमित
शिवसेना व मनसे युतीची शक्यता झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचे कौतुक आणि गोडवे गायले आहेत. खासदार राऊत म्हणाले की, “हे जे मुलं आहेत सगळी त्यांच्या जन्मापासून हे आधी दोन भाऊ आहेत ना… मी या दोघांनाही पाहिलं आहे. दोन्ही नेत्यांमध्ये फोन झाले सुद्धा असतील. तुम्हाला फळ दिसल्याची कारण आहे ना… फळ झाडावरती यायला आधी बी लावावी लागते, मग पाणी द्यावे लागते, मग वाढवावा लागतो, मग फांद्या येतात, अशा अनेक प्रक्रियेतून फळ येत. त्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. काही दिवसात तुम्ही असं देखील म्हणा झाडाला खूपच फळ आली आहेत. अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहिलं जसा आमचा आदित्य आहे तसा अमित आहे. आणि त्यांची विधानंही फार गोड आहेत. त्यांच्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्या भावनेचे काका म्हणून स्वागत करतो त्यांचे विधान छान आहेत चांगले आहेत. मी कॅफेमध्ये नाही मी घरी जाईन आमच्यासाठी ते कॅफे नाही आमच्यासाठी ते दुसरं घरच आहे,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी कौतुक गायले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्यांच्यासोबत ‘या’ विषयांवर चर्चा होऊ शकते
पुढे संजय राऊत म्हणाले की, “मुंबई महानगरपालिकेचा विषय आहे. एकनाथ शिंदे पक्ष आणि भाजपा आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाराष्ट्राचे शत्रू नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आज पक्षांतर झाले आहेत याआधी पण ज्या पद्धतीने अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या पाठीवर घाव घातलेला आहे तसे घाव यांनी घातलेले मला दिसले नाहीत. हे राज ठाकरे यांनी देखील मान्य केले त्याच्यामुळे त्याच्यावरती भविष्यामध्ये एका टेबलावरती चर्चा होऊ शकते,” असे सूचक विधान खासदार संजय राऊत यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.