नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरण बिघडणार (संग्रहित फोटो)
नाशिक : नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदगाव शहरात राजकीय घडामोडींना अचानक वेग आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी (दि.१७) काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अक्षय पारस्कर यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार प्रताप अडसड यांच्या उपस्थितीत पारस्कर यांनी कमळाची निशाणी हाती घेतली आणि त्यामुळे नांदगावमधील काँग्रेसमध्ये मोठे खळबळजनक ‘खिडार’ पडले.
पारस्कर कुटुंबाची तीन पिढ्यांची काँग्रेसशी असलेली निष्ठा संपुष्टात आली आहे. अक्षय पारस्कर यांच्या मातोश्रींना काँग्रेसने नगराध्यक्षपदाची उमेदवारी नाकारल्याने नाराजी पेटली. या नाराजीचा फायदा घेत भाजपाने योग्य राजकीय खेळी करत पारस्करांना वळविले, असा राजकीय सूत्रांचा दावा आहे. या घडामोडीनंतर शहरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे आहेत. उमेदवारी नाकारल्यामुळे भाजपातील निष्ठावंत कार्यकर्त्या सुरेखा शिंदे यांनी अखेर अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदाची उमेदवारी दाखल केली आहे.
याशिवाय, नगरपंचायतमध्ये भाजपला सत्ता आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माजी नगरसेविका कल्पना मारोटकर यांनाही उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजपाला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केली.
काँग्रेसमध्येही नाराजीचे वादळ
काँग्रेसच्या निष्ठावंत नगरसेविका सीमा जाधव यांना नगराध्यक्ष तसेच नगरसेवकपदाची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अक्षय पारस्कर यांच्या पक्षांतरामुळे शिवाय भाजप-काँग्रेसमधील असंतोष आणि राष्ट्रवादीच्या एंट्रीनंतर नांदगावची नगरपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. या राजकीय घडामोडींचा मतदारांवर नेमका काय प्रभाव होतो हे प्रत्यक्ष मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम तारखेनंतरच खरे राजकीय चित्र समोर येणार असून, नांदगावच्या राजकारणातील रंगत अजून वाढण्याची पूर्ण शक्यता आहे.
शिवसेनेच्या एका निर्णयामुळे राजकारणात खळबळ
दुसरीकडे, रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने (शिंदे गट) घेतलेल्या एका निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या माजी आमदार तथा नगराध्यक्ष राजन साळवी यांचा मुलगा अथर्व साळवी यांना प्रभाग क्रमांक 15 मधून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यामुळे राजन साळवी यांना रत्नागिरी मोठा झटका बसल्याचे पाहायला मिळत आहे.
हेदेखील वाचा : Satara News : महाबळेश्वर नगरपालिकेत होणार तिरंगी लढत; मेढ्यात भाजपाला सेना, शरद पवार गटाचे आव्हान






