महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ (फोटो- ट्विटर)
मनसेला सोबत घेण्यावरून मविआमध्ये वाद वाढला
संजय राऊतांच्या ट्वीटने राजकारण तापणार
मनसे आणि शिवसेना आधीच एकत्र आल्याचे भाष्य
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांमध्ये राज्याच्या राजकरणात वेगळेच चित्र दिसून आले आहे. गेली अनेक वर्षे एकमेकांपासून दूर असलेले ठाकरे बंधु एकत्रित आले आहेत. दरम्यान मनसेला महाविकास आघाडीत घ्यायचे की नाही यावर मतभेद दिसून येत आहेत. यातच आता संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटने राजकारण तापले आहे.
मुंबई महनगरपालिका जिंकण्यासाठी महाविकास आघाडी आपली पूर्ण ताकद पणाला लावताना दिसून येत आहे. महाविकास आघाडीमध्ये कोण एकत्रित लढणार आहेत आणि कोण स्वतंत्रपणे याबाबत अजून अंदाज आलेला नाही. मनसे सोबत आल्यास उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत जाणार नाही, असे कॉँग्रेसने स्पष्ट केले आहे. त्यातच आता यावर संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे.
काय म्हणाले खासदार संजय राऊत?
दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घेणार नाही. मुंबई कांग्रेस हा कांग्रेसचा व्यक्तिगत निर्णय असू शकतो शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले आहेत. ही लोकेच्छा आहे.
दिल्लीतून आदेश आल्याशिवाय
म न से ला आघाडीत घेणार नाही: मुंबई कांग्रेस
हा कांग्रेस चा व्यक्तिगत निर्णय असू शकतो
शिवसेना आणि म न से आधीच एकत्र आले आहेत,ही लोकेच्छा आहे
त्यासाठी कुणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नाही
श्री शरद पवार आणि डावे पक्ष सुद्धा एकत्र आहेत
मुंबई वाचवा! pic.twitter.com/kwDg49jJjy — Sanjay Raut (@rautsanjay61) November 22, 2025
त्यासाठी कुणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नाही. श्री शरद पवार आणि डावे पक्ष सुद्धा एकत्र आहेत मुंबई वाचवा!
कॉंग्रेस आऊट तर मनसे इन?
राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होत आहेत. यामुळे राजकीय हालचालींना देखील वेग आला आहे. पालिका निवडणुकांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद सुरु झाले असल्याचे दिसून आले आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस नाराज असल्याचे उघड झाले. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये कॉंग्रेसने एकला चलो रे चा नारा दिला आहे. यानंतर राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये नवीन युती होण्याची देखील शक्यता आहे.
Maharashtra Politics : अशी ही बनवाबनवी! कॉंग्रेस आऊट तर मनसे इन? शरद पवारांचा नवा डाव
मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपसह सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाकडून देखील त्यांची 25 वर्षांची सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची राज ठाकरेंसोबत सूत जुळलेले आहे. हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा समोर घेत दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आले. मराठी भाषेसाठी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या या मनोमिलनाची संपूर्ण राज्यामध्ये जोरदार चर्चा रंगली. दोन दशकांनंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या मागे मराठी माणूस उभा राहिला. याच पाठिंब्याचे रुपांतर मतांमध्ये करण्याचा प्रयत्न ठाकरे बंधूंचा प्रयत्न आहे.






