Maharashtra Politics: मुंबईच्या चर्चेवेळी अधिकारी गायब; विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांची नगरविकास सचिवांना नोटीस rahul-narwekar-notice-to-urban-development-secretary-absent-officers मुंबईशी संबंधित महत्वाच्या विषयांवर विधानसभेत चर्चा सुरू असताना मुंबई महापालिका असेल किंवा नगरविकास सचिव तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याच्या मुददयावरून सत्ताधारी तसेच विरोधी आमदारांनी आक्रमक होत तक्रार केली, संबंधित अधिका-यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी दोन्ही बाजूंनी करण्यात आली. त्यावर याची दखल मी घेतली असून नगरविकास सचिवांना मी ताबडतोब नोटीस जारी करत असल्याचे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. विधानसभेत सत्ताधारी पक्षाकडून नियम २९३ अन्वये प्रस्ताव मांडण्यात आला होता. मुंबई महापालिका तसेच ठाणे व कल्याण महापालिकेशी संबंधित विविध विषयांवर यामाध्यमातून चर्चा सुरू होती. मात्र या महत्वाच्या चर्चेच्या वेळी अधिकारी गॅलरीमध्ये एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हता. कायद्यांची अमलबजावणी करणारेच गायब होतात भाजपच्या अतुल भातखळकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सत्ताधारी पक्षाने नियम २९३ चा प्रस्ताव मांडला आहे, पण महापालिका असेल वा नगरविकास असेल एकही संबंधित अधिकारी अधिकारी गॅलरीत उपस्थित नसल्याचे ते म्हणाले. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, या अधिवेशनात हा मुद्दा नवव्यांदा आला आहे. हे सभागृह सर्वोच्च सभागृह आहे. आपण कायदे करतो, अर्थसंकल्प मंजूर करतो. या अधिका-यांचे पगार आपण मंजूर करती पण अधिकारी उपस्थितच नसतात. अधिकाऱ्यांना वाटते हे कामकाज त्यांचे नाही. अधिकाऱ्यांना वाटते हे कामकाज त्यांचे नाही नाना पटोले म्हणाले, या अधिकाऱ्यांना वाटते हे कामकाज त्यांचे नाही. चेंबूरला एका निर्दोष बालकाचा मृत्यू झाला. मान्सूनपूर्व तयारीचे पैसे खर्च करूनही त्या बालकाचा मृत्यू झाला. संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित केली पाहिजे, सरकारचा वचकच प्रशासनावर उरलेला नाही. हा केवळ सभागृहाचा नाही तर राज्यातील १४ कोटी जनतेचा अपमान हे अधिकारी करत आहेत. जयंत पाटील यांनी या अधिका-यांना आता सभागृहाची किमत राहिलेली नाही. राज्य त्याचेच आहे, असे त्यांना वाटते, जे गैरहजर असतील त्यांना किमान तीन दिवस निलंबित करा अशी मागणी केली. तालिका अध्यक्ष समाधान आवताडे यांनी यावेळी सभागृह सुरू असताना आयुक्त किवा संबंधित अधिकारी उपस्थित राहणे आवश्यक होते. या आधी दोन वेळा लेखी खुलासा मागविला आहे. संबंधित अधिका-याकडून लेखी खुलासा मागवत आहोत. Rahul Narwekar, Maharashtra Assembly, UD Secretary Notice, Mumbai BMC Discussion, Absent Officers Assembly, Rule 293 Motion, Sudhir Mungantiwar, Atul Bhatkhalkar
नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघासाठी महाविकास आघाडी एकत्र लढवून महायुतीला आव्हान देण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उपाध्यक्ष असलेल्या सोनिया होळकर यांच्या नावाची चर्चा सुरू असून, त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नात आहे. मात्र, त्यांच्या मातोश्री भाजपमध्ये असल्याने त्या राष्ट्रवादीकडून लढणार की भाजपकडून याबाबत सस्पेन्स आहे.
नाशिक आणि जळगावच्या जागेत अदलाबदल करण्याची मागणी असून, नाशिक भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी ही जागा सुटावी यासाठी मुंबईमध्ये ठाण मांडले होते, तर दुसरीकडे जळगावची जागा भाजपला सुटावी यासाठी तेथील पदाधिकारी देखील आग्रही आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एकूण ६२२ मतदारांपैकी सर्वाधिक सदस्य भाजपचे आहेत, त्या खालोखाल शिंदेसेनेचे आणि मग राष्ट्रवादी अजित पवार यांची सदस्यसंख्या आहे. त्यामुळे महायुतीकडून लढण्यास अनेकांचा कल आहे.
विधानपरिषद निवडणुकीपूर्वीच महायुतीत मतभेद; एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी सुरु
महाविकास आघाडी आणि सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित राहून तगडा उमेदवार देण्याची तयारी देखील केली आहे. विरोधी आघाडी माकप, रिपाइं, इस्लाम समाजवादी पार्टी, एमआयएम यांना देखील बरोबर घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची नात सोनिया होळकर यांच्या नावाची चर्चा आहे. नाशिकच्या लासलगावच्या होळकरांच्या कुटुंबात असलेल्या सोनिया होळकर यांचा शहरी आणि ग्रामीण भागात चांगला प्रभाव पडू शकतो.
होळकर यांची हक्काची मते
महत्वाचे म्हणजे होळकर यांचे नातलग आणि त्यांची हक्काची मते अशी त्यांची बाजू भक्कम असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या आई ह्या सध्या भाजपमध्ये आहे. त्यामुळे त्यांना भाजपमधून देखील संधी मिळू शकते, अशी ही चर्चा सुरू आहे.
नाशिकसाठी शिंदे गट आग्रही, भाजप स्वतंत्र लढणार
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिकच्या जागेसाठी शिंदे गट आग्रही असून, पक्षाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. दुसरीकडे, ही जागा न सोडल्यास भाजप स्वतंत्र उमेदवार उभा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात एकूण ६१९ सदस्य मतदान करणार आहेत. यामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत आहे.






