फोटो सौजन्य- pinterest
अंकशास्त्रामध्ये प्रत्येक अंकाचे स्वतःचे असे वेगळे महत्त्व, ऊर्जा आणि वैशिष्ट्ये असतात. १ ते ९ या मूलांकांमध्ये मूलांक ८ हा सर्वात रहस्यमय, शक्तिशाली आणि शिस्तीचा अंक मानला जातो, कारण या अंकाचा स्वामी ‘न्यायदेवता शनी देव’ आहेत. जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ८, १७ किंवा २६ या तारखेला झाला असेल, तर तुमचा मूलांक ८ येतो. (उदा. २६८), शनी देवाच्या थेट प्रभावामुळे या लोकांच्या आयुष्यात एक वेगळीच खोली आणि परिपक्वता असते. व्यक्तींची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
मूलांक ८ चे लोक सहजासहजी खचून जात नाहीत. त्यांच्या आयुष्यात कितीही मोठी संकटे आली, तरी ते अत्यंत धैर्याने आणि शांत डोक्याने परिस्थितीचा सामना करतात. कठीण प्रसंगात स्वतः वर नियंत्रण ठेवण्याची अद्भुत ताकद शनि देव त्यांना देतात.
या व्यक्तींमध्ये त्यांच्या वयाच्या मानाने खूप जास्त समजूतदारपणा आणि परिपक्वता असते. ते बालिशपणा करत नाहीत आणि प्रत्येक निर्णय अत्यंत विचारपूर्वक, दूरगामी विचार करून घेतात. म्हणूनच लोक अनेकदा महत्त्वाच्या सल्ल्यांसाठी यांच्याकडे येतात.
वरवर जरी हे लोक भौतिक जगात व्यस्त दिसत असले, तरी आतून त्यांचा कल अध्यात्माकडे असतो. जीवनाचे खरे सत्य काय आहे, हे जाणून घेण्यात त्यांना रस असतो. शनिच्या प्रभावामुळे ते दिखाव्यापासून दूर राहून शांतपणे परमेश्वराची भक्ती किंवा ध्यान करणे पसंत करतात.
या लोकांना आयुष्यात कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही. प्रत्येक यशामागे त्यांची कठोर मेहनत आणि चिकाटी असते. मात्र, एकदा यश मिळाल्यानंतर ते दीर्घकाळ टिकते, अशी अंकशास्त्रातील मान्यता आहे.
मूलांक ८ चे लोक प्रामाणिकपणा आणि शिस्त यांना खूप महत्त्व देतात. अन्याय सहन करणे किंवा चुकीच्या मार्गाने यश मिळवणे त्यांना मान्य नसते.
या व्यक्तींना करिअरमध्ये सुरुवातीला संघर्ष करावा लागू शकतो. मात्र, संयम आणि सातत्यामुळे ते पुढे जाऊन चांगले पद, प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थैर्य मिळवतात.
संयम आणि सकारात्मक विचार कायम ठेवा.
मेहनतीवर विश्वास ठेवा, शॉर्टकट टाळा.
शनिवारी शनी देवाची उपासना आणि गरजूंना दान करणे शुभ मानले जाते.
राग आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)






