फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मात दिवाळीचा सण खूप महत्वाचा आहे. हा सण भारतीय संस्कृतीतील एक प्रमुख सण आहे. देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या काळात देवी लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. दिवाळीमध्ये देवी लक्ष्मी आणि गणपती बाप्पाची पूजा केली जाते. दिवाळीमध्ये देवी लक्ष्मीसोबतच महालक्ष्मीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. यंदा लक्ष्मीपूजन मंगळवार, 21 ऑक्टोबर रोजी प्रदोषकाळात महालक्ष्मी पूजा करणे शास्त्रांनुसार योग्य मानले जाते. अमावस्या तिथी सूर्यास्तापर्यंत असते, म्हणून ही तिथी योग्य मानली जाते. यंदा लक्ष्मीपूजन कधी आहे आणि मुहूर्त काय आहे, जाणून घ्या
आश्विन कृष्ण चतुर्दशी तिथीची सुरुवात 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.45 वाजता संपणार आहे. त्यानंतर अमावस्या तिथी सुरू होईल. ही अमावस्या तिथी मंगळवार, 21 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5.55 पर्यंत असणार आहे. यावेळी मंगळवार, 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन आहे. त्याबरोबरच अमावस्या आणि प्रतिपदा या योगादरम्यान सायंकाळी प्रदोष काळात अर्थात सूर्यास्तानंतर सुमारे 2 तास 24 मिनिटांचा कालावधी लक्ष्मीपूजन करण्यासाठी असणार आहे.
या तिथीची सुरुवात सोमवारी होत असल्याने त्याला सोमवती अमावस्या असे म्हटले जाईल. मात्र अमावस्येच्या दिवशी प्रदोष काळ व्याप्त आहे. 21 ऑक्टोबरला प्रतिपदा अर्थात वृद्धिंगत होणारी तिथीने व्याप्त असलेली अमावस्या लक्ष्मीपूजेसाठी योग्य असेल असे धर्मसिंधू ग्रंथात म्हटले आहे. प्रदोष काळ हा महादेवांच्या पूजेसाठी खूप शुभ मानला जातो. या काळात पूजा केल्यास साधकाला त्याचा खूप फायदा होतो. तर लक्ष्मीपूजन तिथीला लक्ष्मी देवीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. परंतु प्रदोष काळामध्ये लक्ष्मीपूजन करणे योग्य ठरणार नाही.
लक्ष्मीपूजनाच्या वेळी देवीची पूजा केल्याने घरात धन, सुख, समृद्धी आणि मंगल वातावरण नांदते असे शास्त्रात सांगितले आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अनेकजण आपल्या घरात लक्ष्मी आणि गणपती बाप्पाच्या मूर्तींची स्थापना करून दीप प्रज्वलित करतात.
हिंदू शास्त्रानुसार, प्रत्येक देवतेची पूजा करण्यासाठी आणि त्याचे फायदे आशीर्वाद मिळविण्यासाठी एक वेळ मूहूर्त निश्चित केलेली असते. यावेळी लक्ष्मी देवीची पूजा करण्यासाठी आणि तिला आवाहन करण्यासाठी तसेच तिची स्थापना करण्यासाठी जो शुभ आणि स्थिर काळ आवश्यक असतो तो प्रदोषकाळात पूर्ण होत नाही, असे म्हटले जाते. त्यामुळे लक्ष्मी देवीचा आशीर्वाद आणि संपत्तीमध्ये स्थिरता मिळवायची असल्यास पूजन आणि प्रदोष काळानंतर, स्थिर मुहूर्तावर पूजा करणे चांगले मानले जात नाही.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)