प्रेमानंद महाराजांचे तीर्थयात्रेबाबत काय आहे मत (फोटो सौजन्य - Instagram/iStock)
देवाने संपूर्ण जग निर्माण केले आहे. त्याने प्रत्येक प्राणी जगण्यास सक्षम बनवला आहे. त्यामुळे देवावर विश्वास ठेवणारे भक्त पूजा, जप आणि ध्यानाद्वारे त्याला प्रसन्न कऱण्याचा प्रयत्न करत असतात. सनातन धर्माप्रमाणे काही मंदिरात जाऊन देवाची पूजा करतात, तर काही तीर्थयात्रेला जाऊन देवाची पूजा करतात. वृंदावनातील श्री हित राधा केली कुंज प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात तीर्थयात्रेची आवश्यकता का आहे याबद्दल एका भक्ताने प्रश्न विचारला आणि याबाबतचे महत्त्व त्यांनी उत्तराद्वारे दिले आहे, जे सर्वांनी जाणून घ्यायला हवे.
प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात तीर्थयात्रेबद्दल एका भक्ताने प्रश्न विचारला, ज्याच्या उत्तरात प्रेमानंद महाराज म्हणाले, ‘ज्याप्रमाणे मेहंदीमध्ये लालसरपणा असतो, परंतु जर आपण मेहंदीचे झाड तोडले तर आपल्याला कुठेही लालसरपणा दिसणार नाही. हा या झाडाचा स्वभाव आहे. त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्रे अध्यात्माची केंद्रे आहेत. ज्याप्रमाणे गंगेत स्नान केल्यानंतर एखाद्या व्यक्तीला पवित्रता जाणवते. परंतु ही भावना तेव्हाच होते जेव्हा व्यक्ती गंगेत स्नान करण्याचे नियम पाळते. जर तुम्ही नियमांनुसार गंगेत स्नान केले नाही तर तुम्हाला कोणताही दिव्य अनुभव येणार नाही.
तीर्थयात्रेबाबत प्रेमानंद महाराज काय म्हणाले?
प्रेमानंद महाराजांनी पुढे तीर्थयात्रेबाबत आपले मत मांडले आणि ते म्हणाले की, ‘जर तीर्थयात्रा नियमांनुसार केली तर तुम्हाला एक दिव्य अनुभव मिळतो. ही सर्व तीर्थक्षेत्रे आपल्याला आध्यात्मिकरित्या मदत करण्यासाठी बनवली गेली आहेत. या स्थळांना भेट देऊन आपल्या चुका आणि पापांचा नाश होतो. आपण या तीर्थस्थळांना जातो जेणेकरून आपण काही चूक केली तर येथे जाऊन आपली पापे नष्ट होतात’
आपल्याला गृहस्थ जीवन जगण्यासाठी नवीन साधना मिळते. मानवांनी सर्व तीर्थयात्रा केल्या पाहिजेत, यामुळे तुमचे मन आणि शरीर दोन्ही शुद्ध होते. प्रत्येकाने तीर्थयात्रेत किमान एक दिवस उपवास करावा. जर तीर्थयात्रा ३ दिवसांची असेल तर पहिल्या दिवशी पूर्ण उपवास करावा, दुसऱ्या दिवशी फळे खावीत आणि तिसऱ्या दिवशी अन्न सेवन करावे. तीर्थयात्रेला जाऊन दुःख भोगावे असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.
Shani Gochar: 2027 पर्यंत या राशीच्या लोकांवर शनि देवाची राहणार विशेष कृपा, व्यवसायात होणार फायदा
कोण आहेत प्रेमानंद महाराज?
वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात नेहमीच भक्तांची गर्दी असते. भक्त त्यांच्यासोबत त्यांच्या समस्या शेअर करतात. त्यांच्या भक्तांच्या यादीत सामान्य लोकांसह मोठ्या व्यक्तींचाही समावेश आहे. प्रेमानंद महाराज दररोज मध्यरात्री वृंदावनात पदयात्रेला जातात. जिथे त्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांब रांगा त्यांच्यासोबत चालतात. अलिकडेच भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीनेही त्यांना भेटण्यासाठी आश्रमात भेट दिली होती आणि त्यानंतर त्याची १८ वर्षांची आरसीबीसाठी कप जिंकण्याची तपश्चर्या पूर्ण झाली असे भक्तांचे मानणे आहे.
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.