rajkumar thapa( फोटो सौजन्य- social media)
India vs Pakistan War: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करण्यात आली. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानातील दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त केली. तरीही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहे. पाकिस्तानकडून भारतावर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर भीषण हल्ला करून काउंटर अटॅक केला. आता एक दुःखद बातमी समोर आली आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात अति. जिल्हा विकास आयुक्तांच्या मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
India Vs Pakistan War Live: श्रीनगर ते गुजरात अन्…; 26 ठिकाणी भारताकडून पाकचे हल्ले निष्प्रभ
पाकिस्तानच्या गोळीबारात अति. जिल्हा विकास आयुक्तांच्या मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली आहे. राजौरीमध्ये अति.जिल्हा विकास आयुक्त राजकुमार थापांचा मृत्यु झाला. राज कुमार थापा हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत देखील सहभागी झाले होते. जम्मू- काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केले आहे.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री काय म्हणाले?
जम्मू -काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला ट्विट करत म्हणाले की, राजौरीहून आलेली ही धक्कादायक बातमी आहे. आपण जम्मू-काश्मीर प्रशासन सेवेतील एक समर्पित अधिकारी गमावला आहे. कालच ते उपमुख्यमंत्र्यांसोबत जिल्ह्यात फिरत होते आणि माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाइन बैठकीला उपस्थित होते. आज पाकिस्तानने राजौरी शहराला लक्ष्य करत केलेल्या गोळीबारात अधिकाऱ्याच्या निवासस्थानावर हल्ला झाला, ज्यामध्ये आमचे अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त श्री. राजकुमार थप्पा यांचा मृत्यू झाला. या भयानक जीवितहानीबद्दल मला धक्का आणि दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो…असं ओमर अब्दुल्ला म्हणाले.
पाकिस्तानकडून दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न
पाकिस्तानकडून भारतावर हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर भीषण हल्ला करून काउंटर अटॅक केला. आता पाकिस्तानकडून दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र हरियाणातल्या सिरसामध्येच पाकिस्तानचे क्षेपणास्त्र पाडण्यात आले. पहाटेपासून भारत- पाकमध्ये जोरदार हवाई हल्ले सुरु आहे. पाकिस्तानने Fattah-1 क्षेपणास्त्राद्वारे पाकने भारतावर हल्ला केला आहे. पाकिस्तानकडून भारताच्या अनेक हवाई तळांवर हल्ले करण्यात आले. जम्मू एअर बेस, उधमपूर एअर बेस, पठाणकोट एअर बेस, श्रीनगर एअर बेस, बियास एअर बेसवर पाककडून हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.