फोटो सौजन्य- istock
श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. हा सण यंदा शुक्रवार, 15 ऑगस्ट रोजी सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. जन्माष्टमीच्या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांचा एक विशेष संयोग दिसून येत आहे. कृष्ण जन्माष्टमीला एक-दोन नव्हे तर तीन ग्रह वक्री होणार आहे. याचा सकारात्मक परिणाम काही राशीच्या लोकांवर होणार आहे. शनि, राहू, केतू वक्री स्थितीत असतील आणि बुध प्रत्यक्ष स्थितीत असेल त्यामुळे हा काळ काही राशीच्या लोकांसाठी शुभ राहणार आहे. वक्री स्थितीमुळे या राशीच्या लोकांचे चांगले काळ सुरु होतील. शनिसह 3 ग्रहांच्या वक्रीमुळे कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
शनि, राहू आणि केतूच्या प्रतिगामी स्थितीचा परिणाम वृषभ राशीच्या लोकांवर सकारात्मक होणार आहे. या काळात तुम्हाला असलेल्या समस्या दूर होतील आणि मान-सन्मानात चांगली वाढ होईल. वैवाहिक जीवनात सुरु असलेल्या समस्या दूर होतील. पैशांशी संबंधित समस्या दूर होतील. तुम्हाला करिअरमध्ये नवीन सुरुवात करायची असल्यास चांगली संधी मिळू शकते. मानसिक चिंतेत वाढ होईल.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा वक्रीचा काळ खूप चांगला राहणार आहे. या काळामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकता. कौटुंबिक जीवनात सुरू असलेल्या समस्या संपतील. आरोग्य चांगले राहील. तुम्ही मालमत्ता खरेदी करु शकता. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. त्याचसोबत तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.
शनि, राहू, केतू वक्री असल्याने तूळ राशीच्या लोकांना या काळामध्ये आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच तुमचा बँक बॅलन्स देखील वाढेल. जर आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्या असल्यास त्या दूर होऊ शकतात. त्याचसोबत तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या देखील मजबूत राहाल. तुमच्या व्यवसायात वाढ होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. या काळात तुम्हाला मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.
ग्रहांच्या वक्रीचा परिणाम मीन राशीच्या लोकांवर सकारात्मक होणार आहे. या काळामध्ये तुमची आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. तुम्हाला संपत्तीच्या बाबतीत खूप काही मिळेल. या काळात तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षित फायदा होईल. नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा होऊ शकते. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला आहे. या काळात तुमच्या सर्व समस्या दूर होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)