EKADASHI (फोटो सौजन्य- PINTEREST)
दरवर्षी चैत्र महिन्याचा शुक्ल पक्षाची एकादशी तिथीला कामदा एकादशीचा उपवास केला जातो. हा उपवास पुण्य फळ देणारा आणि सगळ्या पापांपासून मुक्ती देणारा मानले जाते. चला जाणून घेऊयात कामदा एकादशीला कोणती कथा वाचण्यात येते.
Mahavir Jayanti 2025: महावीर जयंती नक्की ९ की १० एप्रिलला? जाणून घ्या योग्य तारीख व महत्व
हिंदू धर्मात एकादशी उपवासाचा एक विशेष महत्व आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिपूर्वक पूजा केली जाते. यामुळे घरात धन आणि समृद्धी वाहते. दरवर्षी चैत्र महिन्याचा शुक्ल पक्षाची एकादशी तिथीला कामदा एकादशीचा उपवास केला जातो. हा उपवास पुण्य फळ देणारा आणि सगळ्या पापांपासून मुक्ती देणारे मानले जाते. शास्त्रात म्हंटले गेले आहे कि या दिवशी विधिपूर्वक उपवास आणि पूजा केल्याने सगळ्या पापांपासून मुकतात मिळते आणि त्याच्या जीवनात सुख समृद्धी येते. चला जाणून घेऊयात कामदा एकादशीला कोणती कथा वाचण्यात येते.
कामदा एकादशीला वाचण्यात येणारी कथा कोणती.
म्हंटल जात कि पुंडरिक नावाचा नागांचा एक राज्य होता. हे राज्य खूप श्रीमंत आणि समृद्ध होता. या राज्यात अप्सरा, गंधर्व आणि किन्नर राहत होते. तिथे ललिता नावाची एक अतिसुंदर अप्सरा आणि तिचा नवरा ललित दोघेही तिथे राहत होते. ललित नाग दरबार मध्ये गाणे गात होता आणि आपला नृत्य दाखवून सगळ्यांचा मनोरंजन करत होता. दोघांचं खूप प्रेम होत. राजा पुंडरिकने एकदा ललितला गाणं गाण्याचा आणि नृत्यू करण्याचा आदेश दिला. नाचताना आणि गाताना, ललितला त्याची पत्नी ललिता आठवू लागली, ज्यामुळे त्याच्या नाचण्यात आणि गाण्यात तो चुलकला. सभेत एक कर्कोटक नावाचे एक नाग देवता उपस्थित होते. ज्यांनी पुंडरिक नावाच्या नाग राजाला ललिताच्या चुकीच्या बाबतीत सांगितले. याने नाराज होऊन राजा पुंडरिकने ललितला राक्षस बाण्याचा श्राप दिला.
यानंतर ललित एका अतिशय कुरूप दिसणाऱ्या राक्षसात बदलला. त्याची अप्सरा पत्नी ललिता खूप दुखी झाली. ललिता आपल्या नावरच्या मुक्तीसाठी उपाय शोधू लागली. तेव्हा एका मुनी ने ललिताला कामदा एकादशीचा उपवास ठेवायला सांगितले. ललिताने मुनींच्या आश्रममध्ये एकादशी उपवासचा पालन केले. आणि या उपासाचा पूर्ण लाभ आपल्या नवऱ्याला दिला. उपासाच्या शक्तीने ललितला राक्षस रूपाने मुक्ती मिळाली आणि पुन्हा तो एक सुंदर गायक गंधर्व झाला.