MAHAVIR (फोटो सौजन्य- PINTEREST)
महावीर जयंती जैन धर्माचे संस्थापक भगवान महावीर यांच्या जन्माच्या स्मरणार्थ जैन समुदाय साजरी करतो. महावीर जयंती चैत्र शुक्ल त्रयोदशीला साजरी केली जाते. हे जैन धर्माचे २४ वे आणि अंतिम तीर्थंकर होते. महावीर जयंतीच्या दिवशी भगवान महावीरांचे अनुयायी त्यांच्या शिकवणीचे स्मरण करतात, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आणि भक्तीभावाने विविध धार्मिक विधी करतात. या वर्षी महावीर जयंती गुरुवारी १० एप्रिलला साजरी केली जाणार आहे.
Kamada Ekadashi: आज कामदा एकादशी; जाणून घ्या श्री हरीच्या पूजेच्या मुहूर्ताची वेळ अन् पद्धत
काय आहे महावीर स्वामींचे पंचशील तत्व?
महावीर स्वामींनी निर्माण केलेले पंचशील तत्व हे जैन धर्माच्या मूलभूत नैतिक आणि नैतिक तत्वांपैकी एक आहे. ही तत्वे जीवनात अहिंसा, सत्य, संयम आणि आत्मशुद्धीच्या मार्गाचे अनुसरण करण्यावर भर देतात:
अहिंसा- प्रत्येक परिस्थिती मध्ये हिंसा पासून दूर राहण्याचा संदेश दिला आहे. त्यांनी सांगितलं की चुकूनही कोणाला दुखवू नये.
सत्य- जो व्यक्ती बुद्धिमान असतो आणि सत्याशी जुडलेला असतो तो मृत्यू सारखे कठीण मार्गांना देखील ओलांडतो. म्हणून त्यांनी सैदव लोकांना सत्य बोलण्याची प्रेरणा दिली.
अस्तेय- जे अस्तेयचे पालन करतात ते परवानगीशिवाय कोणत्याही स्वरूपात काहीही स्वीकारत नाहीत. अशे व्यक्ती नेहमी संयमित राहतात आणि केवळ तेच वस्तू स्वीकारतात जे स्वेच्छेने दिले जाते.
ब्रह्मचर्य- हे तत्व अवलंब करण्यासाठी जैन लोकांना पवित्रता आणि संयमाच्या गुणांचे पालन करावे लागतात. ज्यामध्ये ते कोणत्याही प्रकारच्या लैंगिक क्रियाकलापांपासून दूर राहतात.
अपरिग्रह- असे मानले जाते, अपरिग्रहाचा अभ्यास केल्याने जैन लोकांची आत्मिक चेतना विकसित होते आणि दुनियेतील भौतिक वस्तू आणि सुख आणि चैनीपासून दूर राहतात.
कशी साजरी केली जाते महावीर जयंती?
महावीर जयंतीच्या निमित्ताने जैन अनुयायी सकाळी प्रभात फेरी काढतात आणि त्यानंतर भव्य मिरवणूक काढून पालखी यात्रा काढली जाते. यानंतर महावीर स्वामींना सोन्या-चांदीच्या भांड्यांनी अभिषेक केला जातो. शिखरांवर ध्वज फडकवले जातात. जैन समुदायाकडून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते आणि थाटामाटात महावीरांची जयंती साजरी केली जाते.