फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह आणि नक्षत्रांच्या होणाऱ्या हालचालींचा आपल्या जीवनावर परिणाम होतो. ऑक्टोबरमध्ये एक विशेष युती तयार होत आहे, जी अनेक लोकांसाठी नवीन शक्यता आणि सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. 7 ऑक्टोबरपासून तयार होणारा बुध आणि यम यांच्यातील 90 अंश मध्यवर्ती युती खूप महत्त्वाची मानली जाते, ज्याचा परिणाम आपल्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक जीवनात जाणवेल.
ज्योतिषांच्या विश्वासानुसार, या दुर्मिळ योगाचा प्रभाव दीर्घकाळ राहणार आहे. यावेळी तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. हा काळ काही राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यशाली मानला जातो. या काळामध्ये जीवनातील अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये यश मिळू शकते. यामुळे हा योग खूप फायदेशीर मानला जातो.
ज्यावेळी दोन ग्रह 90 अंशांच्या कोनामध्ये एकमेंकाच्या समोर येतात त्यावेळी त्याला केंद्र योग म्हणतात. हा योग बुध आणि यम यांच्यामध्ये तयार होत आहे. बुध हा बुद्धिमत्ता, व्यवसाय, संभाषण आणि तर्कशास्त्राचा ग्रह मानला जातो, तर यम हा बदल, संघर्ष आणि नवीन दिशा दर्शविणारा ग्रह मानला जातो. या दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे जीवनात नवीन संधी आणि सकारात्मक बदल होताना दिसून येतील. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी हा काळ खूप शुभ मानला जातो.
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ मानला जातो. या काळात नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती मिळू शकते. तसेच करिअरमध्ये सकारात्मक बदल घडून येताना दिसून येतील. व्यावसायिकांना अचानक एक मोठा आणि फायदेशीर करार मिळण्याची शक्यता आहे. तसेच तुम्ही व्यवसाय उंचीवर नेऊ शकता. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना या काळात अपेक्षित यश मिळेल. कोणतेही निर्णय घाईघाईमध्ये घेणे टाळावे.
तूळ राशीच्या जीवनामध्ये केंद्र योगाचा खूप फायदा होणार आहे. या लोकांना समृद्धी आणि प्रगती आणतो. त्यासोबतच कुटुंबामध्ये शांती आणि आनंद येईल. भागीदारीत केलेले काम यशस्वी होईल आणि नवीन व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. आर्थिक लाभ आणि गुंतवणुकीसाठी हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. मात्र या काळात खर्चावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे.
कुंभ राशीच्या लोकांना या काळामध्ये खूप महत्त्वपूर्ण बदल घडून येतील. तसेच तुम्हाला करिअरच्या नवीन संधी उपलब्ध होतील ज्या तुम्हाला भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. परदेश प्रवास किंवा उच्च शिक्षण देखील या काळात घेऊ शकतात. व्यावसायिकांना अपेक्षित यश मिळेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या योजना आणि प्रयत्न यशस्वी होतील, ज्यामुळे मनोबल वाढेल. या काळात आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. तसेच कामाचा ताण वाढल्याने थकवा आणि मानसिक ताण येऊ शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)