काय नेमकं प्रकरण?
पीडित तरुणी महू परिसरातील रहिवासी आहे. ती डॉ. आंबेडकर विद्यापीठात २०२० मध्ये शिक्षण घेत होती. त्यावेळी ती महू येथील एका कराटे क्लासमध्ये जात होती. त्यावेळी तिथे एका तरुणाने आपले नाव ‘करण सिंह’ असे सांगून तिच्याशी मैत्री केली. हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. १४ जानेवारी २०२४ रोजी घरात कोणीही नसताना आरोपी तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर वारंवार लग्नाचे खोटे आश्वासन देऊन त्याने तिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवले.
बोलण्यावरून अल्पवयीन मुलीची तरुणाने काढली छेड; सतत मेसेज करायचा अन्…
कार्यक्रमादरम्यान झाला खुलासा
आरोपीच्या खोट्या ओळखीचा खुलासा एका कार्यक्रमादरम्यान झाला. कराटे क्लासमध्ये बेल्ट ग्रेडिंगचा कार्यक्रम सुरू होता त्यावेळी ‘जावेद’ असे नाव पुकारण्यात आले, तेव्हा करण सिंह हा प्रमाणपत्र घेण्यासाठी पुढे गेला. यावरून पीडितेला संशय आला. तिने त्याला विचारणा केली असता आरोपीने त्याचे खरे नाव जावेद अख्तर असल्याचे कबूल केले.
जेव्हा त्याचे हे सत्य समोर आले तेव्हा पीडितेने त्याला विरोध केला. त्याने तिला जीवे मारण्याची आणि बदनामी करण्याची धमकी दिली. पीडित मुलगी जेव्हा आरोपीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा जावेदने इन्स्टाग्रामवर बनावट आयडी बनवली. त्यानंतर बनावट आयडीवरून तरुणीचे फोटो एडिट केले आणि अश्लील फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. एवढेच नाही तर हे फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवून तिची बदनामी केली.
धर्मांतरासाठी दबाव
26 फेब्रुवारी 2026 रोजी आरोपीने जुन्या एबी रोडवरील हनुमान मंदिराजवळ तरुणीचा हात धरून तिला जबरदस्तीने सोबत नेण्याचा प्रयत्न केला. “तुला मुस्लिम बनवून माझ्याकडेच ठेवणार,” अशी धमकीही त्याने दिली. यावेळी मध्यस्थी करणाऱ्या एका व्यक्तीलाही त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. असे तक्रारीत नमूद आहे.
पोलीस तपास सुरु
शेवटी पीडित तरुणीने आपल्या कुटुंबाला आणि सामाजिक संघटनांना या प्रकाराची माहिती दिली. त्यांनतर पोलीस ठाण्यात पीडित मुलगी आणि तिच्या कुतुम्बियांनी तक्रार नोंदवली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा मोबाईल डेटा आणि सोशल मीडिया अकाउंट्सची तांत्रिक तपासणी सुरू आहे. पोलिसांनी आरोपी जावेद अख्तरला अटक केली असल्याचे समोर आले आहे.
चिंताजनक! मुली पळून जाण्याच्या घटनांत मोठी वाढ; ग्रामीण भागात अल्पवयीन प्रेमप्रकरणेही वाढले
Ans: मध्य प्रदेशातील इंदूर शहरात.
Ans: खोटी ओळख सांगून संबंध प्रस्थापित करून अश्लील फोटो-व्हिडीओ व्हायरल करत ब्लॅकमेल केल्याचा.
Ans: विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक; मोबाईल व सोशल मीडिया तपासणी सुरू.






