फोटो सौजन्य: गुगल
महाशिवरात्री या सणाला हिंदू धर्मात मोठं महत्त्व प्राप्त आहे. त्यामुळे महाशिवरात्रीनिमित्ताने शिवभक्त मोठ्या प्रमाणात भगवान शंकरांची आराधना करतात. याच महाशिवरात्रीच्या निमित्ताने तीन राशींना महादेवांची कृपा प्राुप्त होणार आहे. कोणत्या आहेत या राशी जाणून घ्या.. ज्योतिष शास्त्रानुसार, महाशिवरात्रीच्य़ा पूर्वीच राहूचं नक्षत्र परिवर्तन होणार आहे. त्यामुळे याचा शुभ परिणाम हा तीन राशींना होणार आहे. ज्योतिष शास्त्रात राहुला अशुभ ग्रह मानला जातो. पांचांगानुसार, राहुच्या प्रभावामुळे नकारात्नक शक्ती वाढते असं म्हटलं जातं हाच राहु आता नक्षत्र परिवर्तन करत आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीसाठी राहुचं होणारं परिवर्तन शुभ असणार आहे. राहुचं परिवर्तन मेष ऱाशीचा शुभ फलदायी ठरणार आहे, या परिवर्तनाने मेष राशीची करियर आणि आर्थिक स्थिती सुधारणार आहे. कामाच्या ठिकाणी नव्या संधी चालून येतील तसंच सातत्य़ाने केलेल्या कष्टाचं आता फळ मिळण्याचा योग देखील आलेला आहे. अडकलेले पैसै मिळतील, गुंतवणूकीसाठी काळ शुभदायी आहे, मात्र कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करतााना सावधगिरी बाळगा. हा मानसिक शांतता देणारा असेल. तुमचं आध्यात्मिक मार्ग निवडेल. एकंदरीतच हा काळ तुम्हाला शुभ फलितं देणारा आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, राहूचा नक्षत्र परिवर्तन कर्क राशीच्या मंडळींसाठी धमाकेदार असणार आहे. खूप दिवसांपासून रखडलेली कामं या काळात महादेवांच्या कृपेने मार्गी लागतील. कौटुंबिक नातेसंबंध सुधारण्यास मदत होईल. आर्थिक समस्या दूर होतील. खूप दिवसांनी कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याचा योग आहे. आर्थिक अडचणी दूर होतील. व्यवसायत नवीन बदल करण्यासाठी हा काळ शुभ आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, राहूचा नक्षत्र परिवर्तन धनु राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आहे. यावेळी, तुम्हाला प्रगतीचा नवा मार्ग मिळालेला आहे. करिअर आणि व्यावसायात नवीन संधी मिळतील. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास हा काळ अनुकुल आहे. राहूच्या कृपेने तुमची सामाजिक मान सन्मान प्रतिष्ठाही वाढेल. यावेळी तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केल्याने तुम्हाला विशेष लाभ मिळेल. तुम्ही नवीन प्रकल्प सुरू करू शकता. अध्यात्माकडे कल असेल, ज्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल. कुलदैवाताचं नामस्मरण करणं शुभफलदायी ठरेल.
जर तुमच्या पत्रिकेत राहूचं स्थान खराब असेल तर यंदा महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांना रुद्राभिषेक करा. महादेवांना रुद्राभिषेक केल्याने राहुचा अशुभ परिणाम दूर होईल. असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे.