फोटो सौजन्य- pinterest
मकरसंक्रांतीच्या सणानंतर येणारा दुसरा दिवस म्हणजे किक्रांत होय. संक्रांतीचा सण हा तीन दिवसांचा असतो पहिला दिवस भोगी, दुसरा संक्रांत आणि तिसरा किक्रांत यालाच कर किंवा कर दिन असे म्हटले जाते. मात्र शास्त्रामध्ये हा दिवस अशुभ मानला जातो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. नवीन वस्तूंची खरेदीदेखील केली जात नाही.
मकरसंक्रांती म्हणजे सूर्य उत्तरायणात प्रवेश करण्याचा दिवस. यानंतर वातावरण, ऋतू आणि निसर्गात बदल घडू लागतो.
ग्रामीण भाषेत संक्रांतीनंतर सुरू होणाऱ्या या बदलत्या काळाला “किक्रांत” असे म्हटले जाते.
किंक्रांतच्या दिवशी स्त्रिया हळदीकुंकू समारंभ आयोजित करतात. या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असे शास्त्रात सांगण्यात आलेले आहे. किंक्रांतीला भोगीच्या दिवशी केलेली भाकरी राखून ठेवली जाते आणि ती शिळी भाकरी खाल्ली जाते, केरकचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे सांगितले जाते, तसेच दुपारी हळदीकुंकू करतात. अशा काही प्रथा किंक्रांतला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात. तसेच, यादिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याचीही प्रथा आहे. या दिवशी संक्राती देवीची पूजा करून तिला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. त्याचप्रमाणे कुलदैवताचे नामस्मरण केले जाते.
कथेमध्ये म्हटल्यानुसार देवी संक्रांतीने संक्रांतीच्या दिवशी संकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यानंतर मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी देवीने किंकर नावाच्या अत्यंत शक्तिशाली आणि क्रूर राक्षसाचा वध केला होता. याच विजयाच्या दिवसाला किक्रांत असे म्हटले जाते. देवीने या राक्षसाचा संहार करुन पृथ्वीवरील सज्जनांचे रक्षण केले होते. म्हणून या दिवशी देवीच्या विजयी रुपाची पूजा केली जाते.
ज्योतिषशास्त्रात किंक्रांत हा दिवस अशुभ मानला जातो. महाराष्ट्रासारख्या काही भागामध्ये या दिवशी महिला शेण सारवत नाही. या दिवशी शिळी भाकरी खाल्ली जाते. तसेच या सणाच्या दिवशी बेसनाचे धिरडे बनवण्याची परंपरादेखील आहे. किंक्रांतीला मोकळे केस सोडून काम करणे वर्ज्य मानले जाते. घरात सतत भांडण होत असल्यास तर या दिवशी शांत राहायला हवे. लांबचा प्रवास करणे टाळायला हवा. या दिवशी कुलदैवतेचे स्मरण करुन देवाची करावी.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: किक्रांत हा मकरसंक्रांतीनंतरचा दिवस किंवा काळ दर्शवणारा लोकपरंपरेतील शब्द आहे. काही भागांत तो संक्रमणानंतरचा अस्थिर काळ मानला जातो.
Ans: लोकसमजुतीनुसार संक्रांतीच्या दिवशी सूर्याचे संक्रमण होते आणि त्यानंतरचा दिवस हा ऊर्जेच्या समतोलाचा मानला जातो. त्यामुळे शुभकार्य टाळण्याची प्रथा आहे.
Ans: दानधर्म, बोरन्हाण, देवपूजा, सूर्योपासना या गोष्टी शुभ मानल्या जातात.






