फोटो सौजन्य:pinterest
घरातील कर्त्या स्त्रीची संपूर्ण घरावर सत्ता असते असं म्हणतात. बऱ्याच कुटुंबात हे घडताना दिसतं. पुर्वापार पाहायला गेलं तर सासुचा सुनेला कायमच जाच होताना आजवर पाहण्यात आलं आहे. मात्र काही ठिकाणी सासू वरचढ सून असं देखील पाहायला मिळतं.याचबाबत पाहायचं झालं तर अशा काही राशी आहेत ज्या राशीच्या महिला फक्त नवऱ्यालाच नाही तर सासूला देखील मूठीत ठेवतात. कोणत्या आहेत या राशी जाणून घेऊयात.
बारा राशींच्या स्वभावाच्या बारा तऱ्हा असतात. प्रत्येक राशीचा स्वामी हा त्या त्या राशीवर प्रभाव टाकत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार, तुमच्या राशीच्या राशीस्वामीचा प्रभाव तुमच्या स्वभावावर आणि आयुष्यावर होत असतो. या बारा राशींपैकी अशा काही राशी आहेत ज्या राशींच्या महिला या कणखर आणि कडक स्वभावाच्या आहेत.
मेष राशीचा स्वामी हा मंगळ ग्र आहे. या राशीचं अधिपत्य मंगळ करतो. मंगळ हा लढाऊ ग्रह आहे. त्यामुळे या राशीच्या महिलांचा स्वभाव हा काहीसा रागीट उग्र असा असतो. या महिलांना नेतृत्व करायला आवडतं. कोणाच्या हाताखाली काम करणं यांना जमत नाही. या महिला सासू आणि नवऱ्य़ाला चांगलंच मुठीत ठेवतात. यांना कोणी हक्क गाजवलेला आवडत नाही. या महिला सासूचा जाच सहन करत नाहीत उलट सासूच यांना घाबरते.
सिंह रास ही सूर्याच्या अंमलाखाली येते. ही माणसं सूर्यासारखीच तेजस्वी असतात पण त्याचबरोबर आक्रमक देखील असतात. यांना स्वतंत्र जगण आवडतं. या महिलांचं त्यांच्या सासूशी फार पटत नाही. विचारांमध्ये तफावत असल्याने अनेकदा यांच्यात खटके उडतात. या राशीच्या महिला रोखठोक बोलणाऱ्य़ा असतात त्यामुळे सासूशी यांचं फार पटत नाही आणि सासू देखील अशा या राशीच्य़ा सुनांना घाबरुन असतात. या महिलांना स्वत:वर आत्मविश्वास असतो स्वत:च्या तत्वांना इतरांसाठी त्या कधीच मुरड घालत नाहीत.
मेषेच्या मंडळींप्रमाणे वृश्चिक राशीचा स्वामी देखील मंगळ ग्रह आहे. मंगळाच्या प्रभावामुळे रा राशीच्या सुना स्वत;चा मुद्दा सासूला पटवून देतात. सासू वयाने मोठी म्हणून तिचा मान राखतात खरं पण चुकीला चूक म्हणण्याची हिंमत या सूनांमध्ये असते त्यामुळे जर सून वृश्चिक राशीची असेल तर भांडण करायला सासू घाबरते. या सूना सासूला देखील आपल्या मुठीत ठेवतात. चुकीच्या गोष्टी .यांना सहन होत नाही म्हणून अनेकदा सासू सुनांमध्ये वाद किंवा खटके उडतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






