फोटो सौजन्य- pinterest
आजचा दिवस चढ उताराचा राहील. आज अंक 8 असणाऱ्या लोकांचा स्वामी ग्रह शनि आहे. अशा वेळी आज सर्व मूलांकाच्या लोकांवर शनि ग्रहाचा प्रभाव असलेला दिसून येईल. आज शुक्रवारचा दिवस आहे ज्याचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि शुक्राचा अंक 6 आहे. आज मूलांक 6 असणाऱ्या लोकांवर कौटुंबिक जबाबदारी जास्त राहतील आणि मूलांक 8 असणारे लोक धार्मिक स्थळाला भेट देतील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमचे अडकलेले काम वेळेवर पूर्ण होतील. कौटुंबिक जीवन चांगले राहील आणि घरामध्ये पाहुणे येऊ शकतात. वैवाहिक जीवन चांगले राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करावे. मतभेद होऊ शकतात. कुटुंबात शांतीचे वातावरण राहील. नवीन योजनांमुळे तुम्ही तुमचे काम चांगले करू शकता.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात ज्यामुळे तुम्ही प्रसन्न रहाल. एखाद्या नवीन प्रवासाला जाऊ शकता. धार्मिक क्षेत्राशी संबंधित असलेल्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आर्थिक लाभ होऊ शकतो.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी नवीन लोकांची ओळख होऊ शकते. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. कोणत्याही व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका.
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. सावधानता बाळगावी. कामाचा ताण जाणवू शकतो. विचारपूर्वक निर्णय घ्यावे. घाइमध्ये कोणतेही निर्णय घेऊ नका.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कुटुंबाची जास्त जबाबदारी तुमच्यावर राहील. त्यामुळे तुमच्यावर थोडा ताण येईल. जोडीदारासोबत संबंध चांगले राहतील.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना काही नवीन संधी मिळतील. यावेळी तुम्हाला विरोधकांपासून सावध राहावे लागेल. जास्त विचार करणे टाळावे. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल.
मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्ही धार्मिक ठिकाणी जाऊ शकता. कामाच्या ठिकाणी समस्यांना तोंड द्यावे लागेल. तुमच्या मेहनतीमुळे वरिष्ठ तुमच्यावर प्रसन्न होतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो. व्यवसायात वादविवादापासून लांब रहा नाहीतर समस्या जाणवू शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






