फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये सूर्याची पूजा करण्यासाठी रथसप्तमीचा दिवस पवित्र मानला जातो. रविवार हा सूर्याचा दिवस मानला जातो. या दिवशी सूर्यदेवासाठी विशेष प्रार्थना केली जाते. 19 जानेवारीपासून माघ महिन्याची सुरुवात होत आहे. सूर्यदेवाच्या पूजेसाठी हा महिना खूप खास मानला जातो. या महिन्यात रथ सप्तमी येते. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी रथ सप्तमी साजरी केली जाते. यावेळी रथसप्तमी 25 जानेवारी रोजी आहे. या दिवशी भगवान सूर्याला जल अर्पण करून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी सूर्यदेवाची पूजा आणि दान केल्याने आरोग्य आणि यश मिळते. रथसप्तमीचा दिवस हा मकरसंक्रांतीचा शेवटचा दिवस असतो. रथसप्तमी कधी आहे, पूजा करण्याची पद्धत आणि वेळ जाणून घ्या
रथ सप्तमीच्या दिवशी सूर्याला प्रार्थना करण्याची प्रथा आहे. यावर्षी रथ सप्तमीला सकाळी 7.13 वाजता सूर्योदय होईल. रथ सप्तमीला पवित्र नदीत स्नान करणे देखील एक सामान्य प्रथा आहे. यावेळी रक्षसप्तमी रविवार, 25 जानेवारी रोजी असून सप्तमीची सुरुवात 25 जानेवारीला रात्री 12.39 वाजता होऊन त्याची समाप्ती रात्री 11.10 वाजता होईल. यावर्षी रथ सप्तमीला स्नान करण्याचा शुभ मुहूर्त पहाटे 5.26 वाजता सुरू होईल आणि सकाळी 7.13 पर्यंत राहील.
रथ सप्तमीच्या सकाळी शुभ मुहूर्तावर स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी, रोळी, तांदूळ, लाल फुले आणि पाणी घ्या. नंतर सूर्यदेवाचे मंत्र जप करताना त्यांना पाणी अर्पण करा. आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा. सूर्य चालीसा पठण करा. पूजा पूर्ण झाल्यानंतर, गरिबांना दान करा.
रथसप्तमीचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे सूर्यदेवाची पूजा. हिंदू धर्मात सूर्य देवाला जीवनाचा स्त्रोत मानले जाते. सूर्याच्या प्रकाशामुळेच जीवन, कृषी आणि आरोग्य टिकते अशी श्रद्धा आहे. रथसप्तमीवर सूर्य देवाचे पूजन केल्याने आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे होतात, असे म्हटले जाते. शरीराला नवीन ऊर्जा लाभते, आरोग्याचा समतोल राहतो, मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होते, हे सर्व कारणे रथसप्तमीला अत्यंत शुभ मानले जाते
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: रथसप्तमी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरी केली जाते. यावेळी रथसप्तमी 25 जानेवारी रोजी आहे
Ans: रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवाच्या जन्मदिनाशी (सूर्य जयंती) संबंधित मानला जातो. या दिवशी सूर्यदेव रथावर आरूढ होऊन उत्तरायणाकडे प्रस्थान करतात, अशी धार्मिक मान्यता आहे.
Ans: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा आत्मा, आरोग्य, मान-सन्मान आणि नेतृत्वाचा कारक ग्रह आहे. रथसप्तमीला सूर्यपूजा केल्याने या क्षेत्रांत लाभ होतो.






