भगवान परशुराम हे विष्णूचा सहावा अवतार मानला जातो. पित्याचा शब्द हा अंतिम शब्द परशुरामासाठी असे. याच परशुरामांनी वडिलांच्या शब्दाखातर आपल्या जन्मदात्या आईचीच हत्या केली. पुराणात सांगितलेल्या दंतकथेनुसार झालं असं की, ऋषि जमदग्नि हे देवी रेणुका यांचे पती. ऋषि जमदग्नि हे धर्म कुळाचार रिती भाती मानणारे होती. देवी रेणुका पतीव्रता आणि धर्मनिष्ठ पत्नी होती. देवी रेणुका कायमच आपल्या पतीची पुजा करत असे. रोज मातीचं भांड तयार करुन त्या नदीतील पाण्याने देवी रेणुका पतीची पुजा करत. असा दिवसाचा नित्य क्रम चालत असे. मात्र एकदा झालं असं की, देवी नदीकाठी गेली असता अनाहुतपणे तिच्या हातून चूक झाली. ऋषि जमदग्नि यांच्या कानावर पडताच त्यांच्या रागाचा पारा चढला.
ऋषि जमदग्नि यांनी आपल्या मुलांना आदेश दिला की देवी रेणुकाचा शिरच्छेद करावा. मात्र कोणत्याही पुत्राच्या अंगी आईला मारण्याचं बळ नव्हतं. पण देवी रेणुकेचा सर्वात लहान मुलगा परशुराम पुढे आला आणि त्याने वडिलांची आज्ञा मान्य केली. परशुरामाने स्वत:च्या हाताने जन्मदात्या आईची हत्या केली. त्यांनतर ऋषि जमदग्नि परशुरामावर प्रसन्न झाले आणि त्यांनी परशुरामाला सांगितले की, मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू तुला जे हवं ते माग. परशुरामाने वर मागितला की, माझी जन्मदाती आई म्हणजेच रेणुका देवीला पुन्हा जीवंत करण्याचा वर मागितला. परशुरामाचा हा वर खरा झाला. त्यानंतर रेणुका मातेला देवी म्हणून पुजलं जाऊ लागलं. परशुरामाने एकाच वेळी पित्याचा मान राखला आणि आईवरचं प्रेम देखील सिद्ध केलं.
आज हीच रेणुका माता माहुरगडाची देवी म्हणून तीचं स्थान प्रसिद्ध आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक माहुरगड निवासिनी रेणुका मातेचं जागृत देवस्थान आहे. रेणुका मातेला देवी यल्लमा नावाने देखील ओळखलं जातं.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






