फोटो सौजन्य- chatgpt
महाराष्ट्राच्या संतपरंपरेत संत निवृत्तिनाथ यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे. ते केवळ संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू नव्हते, तर त्यांचे सद्गुरू आणि नाथसंप्रदायातील महान योगीही होते. गहिनीनाथांकडून प्राप्त झालेले अध्यात्मज्ञान त्यांनी संत ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांना दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच भावार्थदीपिका अर्थात ज्ञानेश्वरीसारखा अमूल्य ग्रंथ साकार झाला. संत निवृत्तिनाथ यांच्याविषयी अधिक माहिती सविस्तर जाणून घेऊया
संत निवृत्तिनाथ हे महाराष्ट्रातील संत परंपरेतील पहिले ज्ञानदिप मानले जातात. ते संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू आणि त्यांचे गुरू सुद्धा होते. त्यांनीच ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांना अध्यात्माचा मार्ग दाखवला. त्यांच्या शांत, चिरत्त आणि योगी जीवनामुळे नाथसंप्रदायामध्ये महान संत मानलं जातं.
संत निवृत्तिनाथ यांचा जन्म इ.स.१२७३ च्या सुमारास झाला. त्यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी आणि आई रुक्मिणीबाई. विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला होता. पण गुरूंच्या आदेशाने पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला. त्यामुळे समाजाने त्यांना आणि त्यांच्या मुलांना वाळीत टाकलं. या अन्यायामुळे संपूर्ण कुटुंबाला खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. एकदा संपूर्ण कुटुंब हे ब्रम्हगिरी पर्वताला प्रदक्षणा घालत होतं. अचानक एक वाघ समोर आला सर्वजण घाबरुन वेगवेगळ्या दिशेला पळाले. निवृत्तिनाथ मात्र एका गुहेत जाऊन पोहोचले त्या गुहेत महानाथ योगी गहिनीनाथ तपश्चर्या करत होते. गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना ओळखलं आणि त्यांना नाथसंप्रदायाची दीक्षा दिली. योग, ध्यान आणि आत्मज्ञानाचा उपदेश केला.
काही दिवसांच्या साधनेनंतर निवृत्तीनाथ पूर्ण ज्ञानी योगी बनले. हा प्रसंग त्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठा टप्पा ठरला. गुरूकडून मिळालेलं ज्ञान निवृत्तिनाथांनी आपल्या धाकट्या भावडांना दिलं. संत ज्ञानेश्वरांना अध्यात्माची शिकवण दिली, सोपानदेवांना योग मार्ग स्वीकारला आणि मुक्ताबाईंना भक्ती आणि वैराग्याची शिकवण दिली. ज्ञानेश्वरांनी नेहमी निवृत्तिनाथांना आपले सद्गुरू मानलं. भावार्थदीपिका लिहिण्याची प्रेरणा आणि आज्ञा संत निवृत्तिनाथांनी संत ज्ञानेश्वरांना दिली. त्यांच्या आदेशानुसारच संत ज्ञानेश्वरांनी भगवतगीतेचा भावार्थ संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत मांडला. त्यामुळे संस्कृत न जाणणाऱ्या लोकांनाही भगवतगीतेचे तत्वज्ञान सहज समजू लागला.
प्रथम सोपानदेवांनी त्यानंतर ज्ञानेश्वरांनी आणि मग मुक्ताबाईंनी समाधी घेतली. आपल्या प्रिय भावंडांचा विरह निवृत्तिनाथांनी अत्यंत शांतपणे स्विकारला. काही काळानंतर त्यांनीही त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली. नंतर निवृत्तिनाथांचा संदेशही आपण यानिमित्ताने जाणून घेणार आहोत. त्यांच्या शिकवणीचा सार असा होता की, गुरू शिवाय आत्मज्ञान कठीण आहे. अहंकार सोडल्याशिवाय ईश्वरप्राप्ती होत नाही. शांत, मन, संयम हेच खरं धन आहे. भक्ती आणि योग यांचा समन्वय जीवन समृद्ध करतो.
संत निवृत्तिनाथांनी स्वतः फारसे ग्रंथ लिहिले नाही पण त्यांनी घडवले शिष्य संत ज्ञानेश्वर, सोपनादेव आणि मुक्ताबाई यांनी महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेला अमुल्य असं योगदान दिलं त्यामुळे निवृत्तिनाथांना ज्ञानेश्वरांचे गुरू एवढंच नाही तर मराठी संत परंपरेचे शांत, विरक्त आणि तेजस्वी मार्गदर्शक म्हणून आजही स्मरण केलं जातं.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: संत निवृत्तिनाथ हे महाराष्ट्रातील संत परंपरेतील महान संत, नाथसंप्रदायाचे योगी आणि संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू व सद्गुरू होते.
Ans: त्यांनी संत ज्ञानेश्वरांना आत्मज्ञान, योग, भक्ती आणि अध्यात्माची शिकवण दिली तसेच ज्ञानेश्वरी लिहिण्याची प्रेरणा दिली.
Ans: गुरूभक्ती, आत्मज्ञान, अहंकाराचा त्याग, संयम, वैराग्य आणि भक्ती-योगाचा समन्वय हा त्यांच्या शिकवणीचा मुख्य आधार होता.






