फोटो सौजन्य- pinterest
वास्तुशास्त्रानुसार तुम्ही घरामध्ये वास्तूच्या नियमांचे पालन केल्यास घरामधील अनेक समस्या टाळण्यास तुम्हाला मदत होऊ शकते. वास्तुशास्त्रात, नकारात्मकतेपासून सुटका मिळविण्यासाठी कापूरचा उपाय करणे खूप फायदेशीर मानले जाते. तसेच जीवनातील अनेक संकटावर मात करण्यासाठी कापूरचा हा उपाय करणे खूप फायदेशीर ठरतो. जाणून घ्या कापूरचे कोणते उपाय करायचे ते.
वास्तूशास्त्रामध्ये कापूरला विशेष महत्त्व आहे. घरामध्ये कोणतेही वास्तुदोष असल्यास ते त्वरीत दूर होण्यास मदत होते. एकदा हे दोष दूर झाले की, जीवनात आनंद आणि समृद्धी येते. असे मानले जाते की ज्या घरामध्ये नियमितपणे कापूर जाळला जातो त्या ठिकाणी वाईट शक्ती कधीच प्रवेश करत नाही. तसेच ज्यांच्या घरामध्ये लहान मुल असतात त्या घरामध्ये बहुतेकदा नकारात्मक उर्जेने वेढलेली असतात. त्यामुळे भिंती आणि चिंता वाढते. मुलांपासून वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी संध्याकाळी कापूरचे काही तुकडे जाळले पाहिजेत. असे कापूरचे काही उपाय केल्याने व्यक्तीला जीवनामध्ये समस्या जाणवत नाही.
जर एखादी गोष्ट वारंवार चुकत असल्यास घरामधील नकारात्मक ऊर्जा त्याचे कारण असू शकते. अशा वेळी तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये कापूर जाळला पाहिजे. यामुळे नकारात्मकता दूर राहते आणि घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो. तुमच्या समस्या सुधारण्यास सुरुवात होईल. त्यासोबतच वारंवार आर्थिक समस्या असल्यास लवंगासह कापूर जाळला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला आराम मिळण्यास मदत होईल.
जर तुम्हाला वारंवार वास्तुदोषाचा सामना करावा लागत असेल तर कापूरचे काहीही उपाय करु शकता. घराच्या कोपऱ्यामध्ये कापूरचा तुकडा ठेवा. ज्यावेळी ते तुकडे वितळतील त्यावेळी त्या ठिकाणी तुम्ही नवीन तुकडे ठेवू शकता. हा उपाय रोज केल्यास वास्तूदोष दूर होण्यास मदत होईल.
वास्तुनुसार, तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर, देव्हारा किंवा तिजोरी किंवा पैसे ठेवण्याच्या जागी कापूर ठेवू शकता. शिवाय, बेडरूममध्ये कापूर ठेवल्याने घरगुती कलह कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच तुम्ही उशीखाली कापूरचा तुकडा ठेवून झोपल्यास तुम्हाला मानसिक शांती आणि चांगली झोप मिळेल. घरातील या ठिकाणी कापूरचा तुकडा ठेवल्याने वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)