फोटो सौजन्य- pinterest
जून महिन्यामधील विनायक चतुर्थीचे व्रत आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला पाळले जाणार आहे यावेळी ही तिथी शनिवार, 28 जून रोजी आहे. विनायक चतुर्थीच्या दिवशी रवी योग तयार होत आहे. तसेच या भद्रा देखील असेल. त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जाणार नाही. यावेळी चंद्राकडे पाहण्यास देखील मनाई असते असे म्हटले जाते. जाणून घ्या विनायक चतुर्थी कधी आहे, शुभ मुहूर्त, शुभ योग आणि भद्रा
द्रिक पंचांगानुसार, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी महत्त्वाची मानली जाते. यावेळी तिथीची सुरुवात शनिवार, 28 जून रोजी सकाळी 9.35 वाजता होईल आणि त्याची समाप्ती रविवार 29 जून रोजी सकाळी 9.14 वाजता होईल. उद्यतिथीनुसार विनायक चतुर्थीचे व्रत शनिवार, 28 जून रोजी पाळले जाईल.
शनिवार, 28 जून रोजी विनायक चतुर्थीची पूजा करण्यासाठी 2 तास 47 मिनिटांचा वेळ मिळणार आहे. यावेळी गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी मुहूर्त सकाळी 11.1 ते दुपारी 1.48 वाजेपर्यंत राहील. यावेळेमध्ये गणपतीची पूजा करणे शुभ मानले जाते. विनायक चतुर्थीला ब्रम्ह मुहूर्त पहाटे 4.5 ते 4.46 पर्यंत राहील. तर अभिजीत मुहूर्त सकाळी 11.56 ते दुपारी 12.52 पर्यंत राहील.
विनायक चतुर्थीच्या दिवशी रवी योग तयार होत आहे. या दिवशी सकाळी 6.35 वाजल्यापासून रवी योग तयार होत आहे जो दिवसभर राहणार आहे. रवी योगाची समाप्ती रविवार, 29 जून रोजी सकाळी 5.26 वाजता होईल. रवी योग हा शुभ योग मानला जात असल्याने सूर्याचे काही उपाय केल्यास सर्व प्रकारचे दोष दूर होतात, असे मानले जाते. यासोबतच रवी योगासोबत हर्षण योग आणि वज्र योग तयार होतील. हर्षण योगाची वेळ सकाळी 7.15 ते संध्याकाळी 7.15 पर्यंत असेल. तर वज्र योगाची वेळ चतुर्थीला सकाळी 6.35 पर्यंत पुष्य नक्षत्र तयार होईल. यानंतर आश्लेषा नक्षत्र सुरु होईल.
चतुर्थीच्या दिवशी भद्राची वेळ रात्री 9.28 वाजता सुरु होईल आणि 29 जून रोजी सकाळी 5.26 पर्यंत राहील. मात्र यावेळी पूजा करताना अडथळा येणार नाही.
विनायक चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे आणि अडचणी दूर होतात. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने जीवनात शुभता वाढते. ज्ञान, बुद्धी, संपत्ती, शक्ती इत्यादींमध्येही वाढ होते, अशी मान्यता आहे. ज्या घरामध्ये विनायक चतुर्थीचे व्रत पाळले जाते त्या घरात कोणत्याही प्रकारचा दोष राहत नाही.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)