भारतरत्न क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांचा जन्मदिन आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
Sachin Tendulkar Birthday : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सचिन तेंडुलकर यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरलेले आहे. लहान वयातच मैदानावर उतरलेला या खेळाडूने यशाला गवसणी घातली. “क्रिकेटचा देव” म्हणून ओळखत मिळवत कोट्यवधी भारतीयांच्या अभिमान बनला. त्यांच्या बॅटमधून निघालेल्या प्रत्येक धावांमध्ये देशाचा अभिमान दडलेला असे. २४ वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीत सचिनने असंख्य विक्रम आपल्या नावावर केले. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये मिळून १०० आंतरराष्ट्रीय शतके ही त्यांची अतुलनीय कामगिरी आजही अढळ आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३४ हजारांहून अधिक धावा करत त्यांनी एक वेगळाच मानदंड निर्माण केला. २०११ च्या ICC क्रिकेट विश्वचषक २०११ विजयात त्यांचे योगदान प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात आनंदाश्रू आणणारे ठरले. सचिनचे करिअर म्हणजे चिकाटी, समर्पण आणि स्वप्नपूर्तीची प्रेरणादायी कहाणी. त्यांनी केवळ सामने जिंकले नाहीत, तर लोकांची मने जिंकली. आजही त्यांच्या आठवणी प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या हृदयात जिवंत आहेत. आज भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा वाढदिवस आहे. (Dinvishesh)
24 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
24 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष
24 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष






