ह्यूमन कॉम्प्युटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शंकुतला देवी यांची पुण्यतिथी आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
भारतातील सुप्रसिद्ध गणितज्ञ आणि “ह्यूमन कॉम्प्युटर” म्हणून जगभर ओळखल्या जाणाऱ्या शंकुतलादेवी यांची पुण्यतिथी आहे. त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला. लहानपणापासूनच त्यांना अंकांची विलक्षण आवड आणि नैसर्गिक गणिती क्षमता होती. कोणत्याही प्रकारची गुंतागुंतीची गणिते त्या काही सेकंदांत तोंडी सोडवत असत. त्यांनी जगभरात विविध कार्यक्रमांमध्ये आपल्या गणिती कौशल्याचे प्रदर्शन केले. १९८० मध्ये त्यांनी अतिशय मोठ्या दोन संख्यांचा गुणाकार केवळ काही सेकंदांत करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आपले नाव नोंदवले. त्यांच्या या अद्भुत क्षमतेमुळे त्यांना “ह्यूमन कॉम्प्युटर” ही उपाधी मिळाली.
शकुंतलादेवींनी गणितावर तसेच इतर विषयांवर अनेक पुस्तके लिहिली. गणित सुलभ आणि रंजक पद्धतीने मांडण्याचे त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. २१ एप्रिल २०१३ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या कार्यामुळे भारताचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल झाले. (Dinvishesh)
21 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
21 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष
21 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष






