छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला (फोटो - टीम नवराष्ट्र)
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आज 351 वा शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जात आहे. 6 जून1674 रोजी शके 1596 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला रायगडावर शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक झाला. राज्य, सैन्य बळ, रणनीती, शस्त्रशास्त्र विद्येमध्ये पारंगत असलेल्या शिवरायांनी वयाच्या 14 व्या वर्षापासून स्वराज्य स्थापनेचा ध्यास मनी घेतला होता. 18 पगड जाती धर्मांना एकत्रित करुन उभारलेले हे जनतेचे स्वराज्य हे सुराज्य होते. आजही छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा