फोटो सौजन्य: सोशल मीडिया
गणपती बाप्पाला येऊन आता सहा दिवस पूर्ण झालेले आहेत. सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. अनेक भक्तगण बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी वेगवेगळ्या गणपती मंदिरांना भेट देत आहेत. त्यातीलच अष्टविनायक गणपती मंदिरांना भेट देण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी जमलेली आहे. आज आपण अष्टविनायक गणपतीपैकी सहावा एक लेण्याद्रीचा गिरिजात्मज गणपती बाप्पाची महिमा जाणून घेणार आहोत. हा एकमेव असा गणपती आहे जो गिरी म्हणजेच पर्वताच्या सानिध्यात वास्तव्याला आहे. गणपती बाप्पाचे एकमेव असे रूप जे डोंगरात एका गुहेत आहे.
लेण्याद्रीच्या गिरीजात्मज बाप्पाची कथा
पौैरानिक कथेनुसार देवी पार्वतीने तिला पुत्र व्हावा म्हणून लेण्याद्रीच्या या डोंगरात 12 वर्षे तपश्चर्या केली होती. देवी सतीने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली. देवी पार्वतीने या गुहेत भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी स्वतःच्या अंगाच्या मळापासून एक मूर्ती बनविली. गणपती बाप्पा सहा हात आणि तीन डोळे असलेल्या बालकाच्या बटुरूपात प्रकट झाले. त्यामुळे बाप्पांना गिरिजेचा म्हणजे पार्वतीचा आत्मज(पुत्र) म्हणून या गणपतीला ‘गिरिजात्मज’ हे नांव मिळाले.या रूपात त्यांनी अनेक दैत्यांच्या पराभव केला.
मंदिराचे वैशिष्ट्य
जुन्नरपासून साकत किलोमीटरवर कुकडी नदीच्या तीरावर लेण्याद्रीचा डोंगर आहे. या डोंगरात 18 गुहा असून हे 8 व्या गुहेत गिरीजात्मज गणपतीचे मंहिर आहे. या गुहेला गणेश लेणी म्हटले जाते. मंदिरात प्रवेश करण्यासाठी 307 पायऱ्या चढाव्या लागतात. या देवळाचे वैशिष्ट्य म्हणजे हे एकाच मोठ्या अखंड काळा दगडापासून बनलेले आहे. मंदिराच्या पूर्व आणि पश्चिमेस 28 लेण्या असून लेण्यात गणेशाची मूर्ती आहे. हे मंदिर सात क्रमांकाच्या गुहेत आहे. बाप्पाची मूर्ती पाषाणात कोरलेली आहे. मंदिर 51 फूट रूंद आणि 57 फूट लांब आहे. याला कोणत्याही खांबाचा आधार नाही. या गुहेची रचना अशी केलेली आहे जोपर्यंत सूर्यप्रकाश तोपर्यंत गुहेत उजेड आहे. या गुहेत कोणत्याही प्रकारची विद्युत उर्जा नाही.
हे देखील वाचा – भक्तांची विघ्ने हरण करणारा ओझरचा विघ्ननेश्वर; अष्टविनायकातील पाचवा गणपती
गणपती बाप्पाचे हे मंदिर दक्षिणामुखी असून मूर्ती उत्तराभिमुख आहे. गुहेत प्रवेश केल्यानंतर प्रथम बाप्पाच्या पाठीचे दर्शन होते. बाप्पाच्या मूर्तीची सोंड डाव्या बाजूला आहे. तसेच बाप्पाच्या दोन्ही बाजूला उजव्या आणि डाव्या बाजूला हनुमान व शंकर भगवंताची मूर्ती आहे. बाप्पाच्या या मूर्तीच्या नाभीत आणि कपाळी रत्नजडीत हिरे आहेत. मंदिर पूर्णपणे दगडातून कोरून बनविले गेल्याने मंदिराला प्रदिक्षणा घालता येत नाही. मंदिरासमोर पाण्याची दोन कुंडे आहेत. तसेच असे मानले जाते की, पांडवांनी त्यांचा वनवास काळ या गुहेत राहून वास केला होता.