हिमालयात ६० वर्षांपासून दडला आहे प्लुटोनियमचा अणुबॉम्ब, आता बनला आहे अत्यंत धोकादायक; जाणून घ्या या प्रकरणाचे सत्य ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
CIA Lost Nuclear Generator Himalayas : ऑक्टोबर १९६५ मध्ये, जगातील सर्वात उंच पर्वतांपैकी एक असलेल्या नंदा देवी (Nanda Devi) शिखरावर एक अत्यंत गुप्त आणि धोकादायक मोहीम (Top-Secret Mission) राबवण्यात आली होती. अमेरिकेची सीआयए (CIA) आणि भारतीय गिर्यारोहकांचे संयुक्त पथक चीनकडून होणाऱ्या क्षेपणास्त्र रेडिओ सिग्नल्सची (Missile Radio Signals) टेहळणी करण्यासाठी एक विशेष पाळत ठेवणारे उपकरण बसवणार होते. तेव्हा अमेरिकेला चीन अण्वस्त्रे विकसित करत असल्याचा संशय होता.
या उपकरणाला ऊर्जा पुरवण्यासाठी SNAP-19C नावाचा एक खास पोर्टेबल न्यूक्लियर जनरेटर (Portable Nuclear Generator) आणला गेला होता. या जनरेटरमध्ये सुमारे ५० पौंड वजनाचा प्लुटोनियम-२३८ (Plutonium-238) वापरण्यात आला होता, जो अण्वस्त्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या पदार्थासारखाच किरणोत्सर्गी (Highly Radioactive) होता. मानवी हस्तक्षेपाशिवाय वर्षानुवर्षे अत्यंत थंड वातावरणात काम करण्यासाठी ते डिझाइन केले होते.
तथापि, जेव्हा टीम शिखरावर पोहोचली, तेव्हा एक तीव्र हिमवादळ (Severe Snowstorm) आले. परिस्थिती इतकी धोकादायक बनली की भारतीय मिशनचे प्रमुख कॅप्टन एम.एस. कोहली (Captain M.S. Kohli) यांना गिर्यारोहकांना त्यांचे उपकरणे बर्फाला बांधून तातडीने माघार घेण्याचे आदेश द्यावे लागले. परंतु, पुढच्या वर्षी जेव्हा टीम ते उपकरण परत आणण्यासाठी कॅम्प फोर (Camp Four) येथे परतली, तेव्हा ते पूर्णपणे गायब झाले होते. ते उपकरण हिवाळ्यातील हिमस्खलनामुळे (Avalanche) बर्फ आणि हिमनदीखाली गाडले गेले असावेत, असे मानले जाते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Medical Warning : COVID लस ठरली प्राणघातक! FDA लावणार ‘Black Box’ची वॉर्निंग; करोडो तरुणांनी ‘यामुळे’ गमावले प्राण
हा अपघात ६० वर्षांपूर्वी झाला असला तरी, याचे परिणाम आज अधिक गंभीर झाले आहेत. नंदा देवीचे हे शिखर गंगा नदीच्या स्रोतांजवळ (Sources of the Ganges River) असल्याने, त्या जनरेटरमध्ये असलेले प्लुटोनियम-२३८ हळूहळू वितळणाऱ्या बर्फासह खाली येऊन गंगा नदीच्या पाण्याला प्रदूषित (Contaminate the Ganges Water) करू शकते, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे १९७० च्या दशकात भारतात राजकीय गोंधळ (Political Turmoil) निर्माण झाला होता. संसदेत प्रश्न उपस्थित झाले आणि तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई (Morarji Desai) यांना चौकशी समिती स्थापन करण्यास भाग पाडले गेले. त्यांनी जनतेला आश्वासन दिले की, गंगेत रेडिओअॅक्टिव्हिटीचे (Radioactivity) कोणतेही चिन्ह आढळले नाही. दरम्यान, अमेरिकेने ‘गुप्तचर बाबींवर भाष्य न करण्याचे’ धोरण स्वीकारून हे प्रकरण दाबून टाकले (Suppressed the Matter) होते.
Insane story. The CIA once hauled a plutonium-powered “portable nuclear device” up a Himalayan peak to spy on China… then a blizzard hit and they left it behind. It’s likely still buried in a glacier feeding the Ganges — a river system that supports ~600 million people. pic.twitter.com/Ll8BmnM7Il — robert (@rfhirschfeld) December 13, 2025
credit : social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Drug Policy : नशेत बुडाल्या ‘या’ महासत्ता? जाणून घ्या युद्ध तोंडावर असताना का उठावली दारू आणि गांजावरील बंदी
जवळजवळ ६० वर्षांनंतर, हा रहस्यमय फॉल्ट पुन्हा एकदा जागतिक चिंतेचा विषय बनला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे जागतिक हवामान बदल (Global Climate Change). न्यू यॉर्क टाईम्सच्या (New York Times) अहवालानुसार, हिमालयातील हिमनद्या वेगाने वितळत (Glaciers Melting Rapidly) आहेत. यामुळे भूस्खलन आणि पूर वाढत आहेत, ज्यामुळे हे उपकरण उघडकीस येण्याचा धोका (Risk of Exposure) वाढला आहे. काही तज्ज्ञांना भीती आहे की, जर प्लुटोनियम कॅप्सूल चुकीच्या हातात पडले, तर ते धोकादायक बॉम्ब (Dangerous Bomb) बनवण्यासाठी वापरले जाऊ शकतात. जरी जनरेटरच्या उष्णतेने हिमनदी कमकुवत झाली असल्याचा दावा निर्णायक नसला तरी, या धोक्याकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. नंदा देवीच्या बर्फाखाली दडलेले हे अणुऊर्जेचे रहस्य, हवामान बदलांमुळे भारताच्या आणि जगाच्या भविष्यासाठी एक मोठे आव्हान निर्माण करत आहे. हे उपकरण परत मिळवण्याचा आणखी एक प्रयत्न तातडीने करणे गरजेचे आहे.
Ans: सीआयएचा पोर्टेबल अणुऊर्जा जनरेटर (SNAP-19C).
Ans: प्लुटोनियम-२३८ (Plutonium-238).
Ans: हिमालयातील हिमनद्यांचे वेगाने वितळणे.






