भारतीय महिला संघाने दाखवले – मुलीही देशासाठी लढतात
भारत पाकिस्तान म्हटलं कि खुन्नस असतेच मग ते जंग असो कि मॅच, लफडा झालाच पाहिजे, या आधी पुरुष क्रिकेट संघाने ज्या प्रकारे पाकिस्तान ला ३-० ने शिकस्त दिली होती तशीच महिला संघाने सुद्धा पाकिस्तान महिला संघाला हरवून बदला घेतलाच. पण एक गोष्ट सारखी घडली ती म्हणजे हारिस रौफला आणि फातिमा सना एकाच माळेचे मणी ठरले हरले तरी टांग उपर !
Women’s World Cup 2025 पाकिस्तान संघाची कॅप्टन फातिमा सना तिलाही वाटले जस पाकिस्तान मेन्स संघाला वाटले होते भारताला हरवू .. सामना सुरु होण्याच्या आधी बडबोलेपणा करण्यात पाकिस्तानच चा हात पकडू शकत नाही. डायलॉगबाजी सुरु होते मग तोंडघासी पडतातच ! पाकिस्तानचा पराभव करून सर्वांना दाखवून दिले की भारतीय मुली मैदानातही कमी नाहीत.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा आज जन्मदिन; जाणून घ्या 07 ऑक्टोबरचा इतिहास
भारताने २४७ धावा करताना उत्कृष्ट फलंदाजी दाखवली. स्मृती मंधाना, रिचा घोष आणि दीप्ती शर्मा यांनी फलंदाजीचा धडाका लावला. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ १५९ धावांवर गारद झाला. म्हणजेच, ज्याप्रमाणे भारतीय पुरुष संघाने हारिस रौफला ‘जोकर’ बनवले होते, त्याचप्रमाणे भारतीय महिला संघाने पाकिस्तानच्या ‘दीदी’ना जोकर बनवले.
‘दीदी’चा ( कॅप्टन फातिमा सना ) हवाबाजपणा
सामन्यापूर्वी फातिमा सना आणि तिच्या सहकाऱ्यांनी “We will change History” असं म्हणत सोशल मीडियावर मोठ्या गोष्टी केल्या होत्या. पण मैदानावर आल्यानंतर सगळं फोल ’ ठरलं. टॉस जिंकून बॉलिंग घेण्याचा निर्णय घेतला आणि नंतर मैदानात चक्क माती खाल्ली
जोकरची ( हारिस रौफ ) टोपी दीदी’ला
फातिमा सना स्वतः १५ चेंडूत फक्त २ धावा करू शकली. इतक्या वाईट स्ट्राइक रेटने खेळल्यावर ती स्वतःच विनोदाचा विषय बनली. पाकिस्तानच्या चाहत्यांनाही आता कळलं की त्यांच्या टीमची ‘रीलबाजी’ चालते, पण परफॉर्मन्स मात्र शून्य. हारिस रौफ ज्या प्रकारे मैदानात टवाळकी करत मनोरंजन करत होता तसच फातिमा सना ही तेच करत असताना दिसली.
नोटा फक्त भारतात छापल्या जातात, तरी सरकार श्रीमंत का होत नाही
भारतीय छोरियांचा दम
हर्मनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दाखवून दिलं की देशाच्या सन्मानाच्या बाबतीत भारताच्या मुली कोणापेक्षा कमी नाहीत. बापानंतर आता आईनेही मुलीला कसं ‘कूटायचं’ हे दाखवून दिलं. ऑपरेशन सिंदूरपासून ते क्रिकेटच्या मैदानापर्यंत, भारताच्या महिला योद्ध्यांनी देशाचं नाव उंचावलं आहे. स्मृती, रिचा, दीप्ती यांच्यासारख्या खेळाडूंनी पाकिस्तानला पुन्हा एकदा आरसा दाखवला..
१९४७ पासून आजपर्यंत पाकिस्तान प्रत्येक रणांगणात हरलाच आहे – मग ते बॉर्डर असो, युद्ध असो किंवा क्रिकेटचं मैदान. मर्दाना टीम, जनाना टीम, आर्मी – सगळीकडून फक्त पराभव.प्रत्येक वेळी पाकिस्तान हवाबाजी करतो, सोशल मीडियावर मोरल विक्टरी घेतो, पण मैदानावर पडतोच. या वेळेस महिला संघानेही त्याच परंपरेला न्याय दिला.
सोशल मीडिया रिअॅक्शन
भारतीय चाहत्यांनी सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या
“दीदींना आज खरंच ‘स्वाद’ आला!”
“जसं मुलांनी केलं तसंच मुलींनीही पाकिस्तानला धुतलं.”
पाकिस्तानचे चाहते मात्र विचारत होते – “साला हे दुख काहे खत्म नाही होत?”
शिकवण
या सामन्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली –हवाबाजी, रीळबाजी आणि बेशर्मीने काही होत नाही. मैदानात मेहनत, रणनीती आणि परफॉर्मन्स लागतो. भारतीय महिला टीमने ज्या प्रकारे खेळ दाखवला, त्यावरून स्पष्ट आहे की भारतीय महिला खऱ्या अर्थाने ‘रिअल हिरो’ आहेत.
निष्कर्ष
पाकिस्तान पुन्हा एकदा हरला – आणि भारताच्या महिलांनी इतिहास घडवला. फातिमा सना आणि तिच्या ‘रीलबाज’ टीमला रियॅलिटी चेक मिळाला. पुढच्यावेळी प्लेन उडवायचं असेल तर ‘पॅराशूट’ बरोबर ठेवावं, नाहीतर पुन्हा ‘क्रॅश’ व्हाल.
प्र.1: भारतासाठी कोणत्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली?
उ: स्मृती मंधाना, रिचा घोष आणि दीप्ती शर्माने अप्रतिम फलंदाजी केली.
प्र.2: हा सामना का चर्चेत आला?
उ: कारण पाकिस्तानच्या ‘रीलबाज’ टीमने सामन्यापूर्वी मोठ्या घोषणा केल्या होत्या पण मैदानात पूर्णपणे फ्लॉप ठरल्या.
प्र.3: या विजयाचं महत्त्व काय?
उ: या विजयाने सिद्ध केलं की भारतीय महिला खेळाडूही देशाच्या सन्मानासाठी पुरुषांइतक्याच ताकदीने लढतात.