मराठा साम्राज्याच्या पानिपत लढाईतील शौर्यासाठी मराठा शौर्य दिन साजरा केला जातो (फोटो - टीम नवराष्ट्र)
पानिपतची लढाई केवळ एका पराभवाची नव्हे तर देशभक्तीच्या उच्च आदर्शांची शिकवण देणारी घटना आहे. मराठा योद्ध्यांचे धैर्य, रणनीती, आणि बलिदान इतिहासात अमर आहे. आजच्या दिवशी पानिपत मराठा शौर्य दिन हा दिवस मराठा साम्राज्याच्या पराक्रमाला आणि त्यागाला सन्मान देण्यासाठी साजरा केला जातो. (Dinvishesh) 14 जानेवारी 1761 रोजी घडलेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धाची आठवण म्हणून हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. या लढाईत मराठा साम्राज्याने अफगाण शासक अहमदशहा अब्दालीच्या प्रचंड सैन्याविरुद्ध पराक्रमाने लढा दिला. जरी या युद्धात मराठ्यांना पराभव पत्करावा लागला, तरी त्यांच्या शौर्य, त्याग, आणि देशभक्तीची कथा आजही प्रेरणादायी आहे. हजारो मराठा सैनिकांनी मातृभूमीसाठी आपले प्राण अर्पण केले. पानिपत मराठा शौर्य दिन हा दिवस मराठा परंपरेचा अभिमान आणि त्यागाच्या भावनेला उजाळा देतो.
14 जानेवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
14 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष
14 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष






