अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेत असतात. आज त्यांच्या अध्यक्ष पदासाठी निवडून येण्याला एक वर्ष पूर्ण होत आहेत. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या २०२४ च्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला होता. त्यांनी डेमोक्रॅट्स पक्षाच्या नेत्या कमला हॅरिस यांचा पराभव केला. यानंतर २० जानेवारी २०२५ रोजी अध्यक्षपदाची शपथ घेतली. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी अमेरिका फर्स्ट धोरणाला प्राधान्य देत अनेक परराष्ट्र विरोधी धोरणे घेतली. अमेरिकेच्या WHO मधून बाहेर पडण्याच्या निर्णयापासून ते स्थलांतरविरोधी धोरणापर्यंत, तसेच त्यांच्यावर अतिरिक्त कर लादणाऱ्या देशांवर परस्पर कर लागू करणे, अशा अनेक धोरणांनी त्यांनी जगाला हादरुन टाकले.
06 नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
06 सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष
राजकीय लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा






